अभिनय जगताचा अनभिषिक्त सम्राट जो गेली ३ दशकांपासून बाॅलिवुडच्या चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवतोय,
बाॅलिवुडचा बादशहा किंग खान या नावाने ओळखला जाणारा महाअभिनेता शाहरूख खानचा जन्मदिवस आजपासून सुमारे ५८ वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झाला.
त्यानंतरच त्याच शिक्षणही दिल्लीतच झालं. खूप कमी वयात त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला कोवळ्या वयातचं त्याच्या डोक्यावरील वडील नावाच छत्र हरपलं नंतरच्या थोड्याच काळात त्याच्या आईनेही जगाचा निरोप घेतला. एवढ्या प्रचंड अडचणींनंतरही तो खचला नाही तर त्याने अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचं मोठ्ठ स्वप्न पाहिलं जे पूर्ण करण्यासाठी तो मायानगरी मुंबईला आला.
चित्रपटसृष्टीत नाव कमावण्याच्या उद्देशाने हजारो लोकं रोज या मायानगरीत येत असतात परंतु अत्यंत कमी मोजक्याचं लोकांच्या हाताला हे यश लागतं.सुरुवातीला अनोळखी वाटणाऱ्या लोकांच्या नगरीचा आपण सम्राट बनू हे स्वप्न त्याने कदाचित पाहिलं असावं . बाॅलिवुडमध्ये पदार्पणापूर्वी त्याने आपल्या करिअरची सुरुवात मालिकेने केली.त्यानंतर त्याला बाॅलिवुडमध्ये प्रवेश करण्याची संधी “दिवाना” या चित्रपटातून मिळाली त्यात त्याची भुमिका दुय्यम असली तरी त्याचा अभिनय वाखानण्याजोगा होता.
त्यातल्या त्याच्या सहजसुलभ तसेच भावनारा अभिनय सुप्रसिद्ध निर्माते/दिग्दर्शक यश चोप्रा यांनी अचुकपणे टिपला व त्याला आपल्या “डर” या चित्रपटात संधी दिली ज्यात तो खलनायकाच्या भूमिकेत होता. ही भुमिका करण्यासाठी यासाठी अनेकांना विचारण्यात आले होते परंतु खलनायकाच्या भूमिकेमुळे करिअरवर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे कुणीही ही भुमिका करण्यास तयार होईना परंतु यश चोप्रांसारख्या मोठ्या व्यक्तिंसोबत काम करायला मिळतंय ही शाहरुखसाठी मोठी संधी होती आणि त्या संधीच त्यान सोनं केलं .
खलनायकाची भुमिका करुनही शाहरुख हिरोपेक्षाही जास्त भाव खाऊन गेला, मग काय त्यानंतर शाहरुखच्या करिअरने मोठी झेप घेतली आधीपासून गाजलेल्या सुपरस्टार्सना मागे सोडत त्याने एकावर एक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली
हळूहळू हा शाहरुख भारतासोबतच परदेशातही गाजू लागला.कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना बाॅलिवुडमध्ये कुणीही ओळखीचं नसताना या अनोळखी प्रदेशावर आपली छाप सोडायची गोष्ट वाटते तेवढी सोप्पी मुळीचं नाही. त्यासाठी त्याने आपलं बरंच काही पणाला लावलं.
आपली संपूर्ण इच्छाशक्ती एकवटून स्वप्न पाहिलं.आणि ते सत्यातही उतरवलं.कथा चांगली असेल तर कुठलाहि चित्रपट प्रेक्षकांना सहज आवडतो परंतु कथा सुमार असूनही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो तेव्हा पुर्णपणे कस हा मुख्य नायकाचा लागत. अत्यंत साध्या वाटणाऱ्या कथानकात जीव ओतण्याचं काम हा नायक करत असतो आणि हेच काम शाहरुखने केलं आहे.भारतामध्ये अनेक अभिनेते आहेत आणि त्यांचे अनेक चाहते आहेत परंतु त्यांचे जे चाहते झाले आहेत ते त्यांनी केलेल्या मारझोड आणि अॅक्शनपटांमुळे
परंतु शाहरुख खान याबाबतीत पुर्णपणे वेगळा ठरतो. त्याने प्रेमाचे संदेश देणारे बहुसंख्य चित्रपट करुन करोडोमध्ये चाहते बनवले आहेत. आणि एकदा बनलेला शाहरुखचा चाहता जिवंत असेपर्यंत तो त्याला सोडत नाही हेही तितकंच खरं आहे.
मीही शाहरुखचा मोठा चाहता आहे शाहरुखचे नव्याने प्रदर्शित झालेले तसेच जुने चित्रपट पाहत असतो. मी त्याच्या अभिनयाचा चाहता तर आहेच परंतु त्याच्यामध्ये अनेकविध अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्याचा कट्टर चाहता होण्यास भाग पाडतात. तो एक उत्तम बिजनेसमन आहे,त्याचं आपलं समाजात वागणं महत्वाचं आहे तो आपल्यापेक्षा खालच्यांना कधीही कमी समजंत नाही किंवा त्यांना हलकी वागणूक देत नाही, समोरच्यामध्ये असलेल्या प्रतिभेची तो कदर करतो. आपल्या कामात त्या कलेचा उत्कृष्टपणे वापर करणं त्याला चांगलं जमतं तो कधीही कुणाची गळचेपी करत नाही किंवा मतभेद झाले म्हणून कुणाचं करिअर खराब करत नाही.कुठं कोणत्यावेळी काय बोलायचं हे त्याला चांगलं जमतं नको त्या गोष्टीला तो अजिबात डोक्यावर घेत नाही.
जगाच्या सुमारे ८०० कोटी लोकसंख्येच्या ३५० कोटी लोकं हे शाहरुखला ओळखतात. शाहरुखचे चाहते हे त्याच्यासाठी अक्षरशः वेडे आहेत. तो आता प्रसिध्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे , करोडोंच्या संख्येत त्याचे चाहते आहेत तो मनात आणील ते करु शकतो . परंतू तो कधीही या गोष्टीचा उन्माद करत नाही. तरीही त्याला काही पक्ष,यंत्रणा आपल्या हेतूला समर्थन देत नाही म्हणून कशातही अडकवण्याचा सतत प्रयत्न करत असतात परंतु तो अशा गोष्टींना अजिबात जुमानत नाही.
जाती-धर्माच्या नावावरुन त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु त्यांना काय माहिती की शाहरुख हा सर्व जाती, धर्म सर्व देशांच्या सीमांपासून मुक्त आहे . जे फक्त म्हणून त्याला माणूस म्हणून पाहतात तेचं त्याच्यावर प्रेम करु शकतात.
शाहरुखच्या “मीर” फाऊंडेशनमार्फत केली जाणारी कार्य कौतुकास्पद आहे. तो आपल्या चित्रपटातुन समाजात सकारात्मक परिवर्तन घडावे या हेतूने फक्त मनोरंजनाचा हेतू समोर न ठेवता संदेश देत असतो.
त्यातील त्याचा ओम शांती ओम मधील आकर्षणाच्या सिध्दांताबद्दलचा नियम मात्र तंतोतंत त्याच्याच बाबतीत लागू पडतो. कि हम किसी चीज को पुरी शिद्दत से चाहे तो पुरी कायनात उस चीज को हमतक पहुंचाने मे जुड जाती है! तुर्तास इतकंच. अशा या महान अभिनेत्याला आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा