![Henry Ford Biography](https://th.bing.com/th/id/R.2e6286074f79e99a4b4a2773253ef6d7?rik=zRQsT5ttbnWhow&riu=http%3a%2f%2fwww.thefamouspeople.com%2fprofiles%2fimages%2fhenry-ford-18.jpg&ehk=IRiDcCTsRW9Wo7I4KKYkT68Fi2JFqNSRu5aKk%2fhAOAw%3d&risl=&pid=ImgRaw&r=0)
“ज्या दिशेने वाऱ्याचा वेग आहे त्या च दिशेला नव्हे तर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विमानाला वाऱ्याच्या वेगाविरुध्द प्रवास करावा लागतो.तरंच ते आपलं ध्येय गाठू शकतं”.
असं म्हणणं आहे आधुनिक कारचे जनक “हेन्री फोर्ड” यांच ज्यांचा जन्म ३० जुलै १८६३ मध्ये अमेरिकास्थित ग्रीनफिल्ड येथे अत्यंत गरीब कुटुंबात झाला ते त्यांच्या आईवडिलांना पाचवे अपत्य होते. त्यांचे वडील “विलियम फोर्ड” हे शेतकरी होते. हेन्रीची खेळणी इतरांपेक्षा वेगळी असत,त्यांना अवजारांमध्ये आवड वाटायची.
त्यांच्या वडिलांनी त्यांना इतर जिज्ञासू मुलांप्रमाणे एक पॉकेट घड्याळ दिलं होतं,परंतु तरुण वयाच्या हेन्रीने ते घड्याळ खोलून टाकलं आणि आश्चर्य म्हणजे इतर साहसी मुलांच्या विपरित त्यांनी त्या घड्याळाला जसच्या तसं जोडलंही .त्यातून त्यांनी स्वतःमधली असलेली यांत्रिक उपलब्धता दर्शविली होती त्यानंतर आपल्या शेजारी पाजाऱ्यांच्या घड्याळांना खोलून जोडायचं काम करायचे ज्यामुळे त्यांना १२ वर्षाच्या वयात एक घड्याळ दुरुस्त करणाऱ्याच्या रूपात ओळख मिळाली.
‘‘हेन्री फोर्ड” यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून गावच्या शेजारी असलेल्या शाळेत जायला सुरुवात केली परंतु काही दिवसांनंतर पैशाअभावी त्यांचे शिक्षण बंद करावे लागले त्यांच्या वडिलांना वाटायचं की हेन्रीने शेती सांभाळावी पण हेन्रीच्या डोक्यात वेगळंच म्हणून त्यांचं शेतीत मन रमलं नाही त्यांना घोड्याशिवाय चालणारी गाडी तयार करायची होती. त्याकाळी चारचाकी आस्तित्वात नव्हती असं नाही परंतु ज्या होत्या त्या प्रचंड दराने विकल्या जात की ज्या खरेदी करताना श्रीमंत लोकांनाही जास्त विचार करावा लागे.
त्यांच्या आईचा मृत्यू प्रसुतीसंबंधी आजारामुळे झाला होता, ही त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना होती,त्यांच्या डोक्यात बसलेलं कार बनवण्याचं स्वप्न त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हतं कार कशा प्रकारे बनवली जाऊ शकते यावर ते सतत प्रयोग करत असत आणि त्यासाठी भरपूर खर्च येई तो भागत नव्हता म्हणून त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडले आणि ते “डेट्रॉईट” येथे एका रेल्वे इंजिन दुरुस्ती ठिकाणी कामाला लागले.
(First car ever made by Henry Ford/Photo Credit:Google)
तेथील कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांच्या कामातल्या प्रामाणिकपणा आणि इमानदारीने ते लवकरच तेथे जेष्ठ अभियंता बनले.त्यांचा पगारही चांगला वाढला परंतू सततचे चालणारे प्रयोग यामुळे त्यांना तो पगारही पुरेना म्हणून त्यांनी अजून एक काम करायला सुरुवात केली.
नक्की वाचा:कर्माचं भान ठेवायला शिका कारण आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना आपली कर्मचं कारणीभूत असतात.
11 एप्रिल 1888 ला वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी ” CLARA JANE BYRANT ” ह्यांच्याशी विवाह केला. त्याकाळी चारचाकी गाडी खरेदी करणं प्रत्येकाच्याच आवाक्यातलं नव्हतं. अधिकांश लोकं घोड्याचा उपयोग करत होते आणि पायी चालत होते. ही परिस्थिती त्या लोकांसाठी अत्यंत खराब होती विशेषकरून जे ग्रामीण भागात राहत होती .
बऱ्याचशा केलेल्या प्रयोगानंतर त्यांची मेहनत फळाला आली आणि १८९६ मध्ये त्यांनी आपली पहिली कार बनवली. जेव्हा कार तयार झाली तेव्हा त्या कारला फिरवायला बाहेर न्यायचं तर बाहेर खूप जास्त प्रमाणात पाऊस चालु होता. परंतु त्याच्यातली उत्सुकता त्या कारला बाहेर घेऊन गेली कारला चालु केल्यानंतर झालेल्या आवाजाने आजुबाजुला असलेले लोक जमा झाले आणि त्यांना आश्चर्य वाटले हेन्रींची सफलता पाहून त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
काही दिवसांनी ती कार विकली त्यातून मिळालेले पैसे आणि अजून काही पैसे टाकून हेन्रींनी १८९९ मध्ये एका कंपनीची स्थापना केली जिचं नाव होतं “डेट्रॉईट अॅटोमोबाईल” त्या कंपनीने जवळपास २५ कार बनवल्या परंतु पैशाच्या कमतरतेमुळे ती कंपनी बंद करावी लागली.
नंतर १९०१ मध्ये हेन्रींनी आपल्या श्रीमंत मित्रांच्या सोबतीने “हेन्री फोर्ड” कंपनीची सुरुवात केली परंतु त्यांच्या मित्रांमध्ये आणि त्यांच्याच गाडीच्या किमतीवरुन मतभेद होते त्यामुळे ती कंपनीदेखील बंद करावी लागली.
(Todays advanced car by Ford Motors/Photo Credit:Google)