(Bajiprabhu Deshpande/Photo Credit:Google)
ही कहाणी आहे त्या महान योध्द्याची ज्यांच्या बलिदानावर पूर्ण मराठा साम्राज्य उभं आहे त्यांच्यासाठी शत्रुपक्षात फक्त एकच बोलणं व्हायचं..
“हुजूर मस्तक तिलकधारी पहाडसा उंचा है खिंडपार ना कोई करे आहट सा रुतबा है बरस रहा आसमान पर गरगराहट तलवार की है खौफ हम दस हजार को नाम उसका बाजी है”|
नरवीर बाजीप्रभूची कहाणी त्या काळापासून सुरू होते जेव्हा सह्याद्री पर्वतरांगेच्या जंगलात राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने शिवरायांनी सोबत काही मावळ्यांना घेत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हृदयात आऊसाहेब जिजाऊंचे संस्कार आणि डोक्यात फक्त एकच स्वप्न मराठा साम्राज्य मावळ प्रांतातले स्थानिक लोक होते तर सामान्यच नागरिक परंतु शौर्य आणि साहस प्रत्येक व्यक्तीजवळ होतं .
बाल शिवाजींपेक्षा पंधरा वर्षांनी मोठा नवयुवक मावळच्या घरनगरातून आपल्या वेगळ्या चालीमुळे प्रसिद्ध होता लहानपणापासूनच त्याच्या मनात मुघलांविषयी प्रचंड आग भरलेली होती त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांच्या सेनेत कार्यरत होते तो सळसळत्या रक्ताचा तरुण दुसरा कोणी नव्हे तर बाजीप्रभू देशपांडे होते.
बाजीप्रभू ज्या जहागिरीशी संबंध ठेवत होते त्याचा जहागीरदार कृष्णाजी देशमुख हा होता आणि बाजीप्रभूंचे वडील या जहागिरीचे दिवाण होते. त्यांच्या मृत्यूनंतर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी दिवाणपद सांभाळले परंतु समस्या ही होती की स्वतः बांदल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांचे विरोधी होते आणि हाच विरोध त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चालू ठेवला त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूपच कटूता होती.
नक्की वाचा: “१० लाख मुघल विरुद्ध ४० शिखांमध्ये झालेलं चमकौरच भयानक युद्ध.”
बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या सहसावर बांदल देशमुख यांनी हिरडसवर आपला दबदबा कायम ठेवला परंतु दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या प्रसाराला सुरुवात केली कोंढाणा, चाकण, तोरणा ,रायगड ,पुरंदर आणि जावळी या प्रसिद्ध किल्ल्यांना छत्रपतींनी आपल्या स्वराज्याशी जोडलं होतं त्यावेळी दख्खन आणि कोकण प्रांत वेगवेगळ्या जहागिरीत वाटलेले होते आणि त्या जहागिरीवर आदिलशाही सुलतानाचं राज्य होतं.
परंतु सुलतानाने आपल्या खास लोकांनाच जहागिरदार बनवलं ते मग हिंदू असो किंवा मुस्लिम. सुलतानाशी जोपण एकनिष्ठ होता त्याला तो जहागिरी देत असे त्यावेळी छत्रपतींची दहशत फक्त मुघलांमध्येच नव्हती तर त्या लोकांमध्येही होती जे आपल्या वतनात राहून त्या वतनाशी गद्दारी करत होते विजापूरच्या सुलतानाची सेवा करत होते त्यावेळी महाराज गनिमी कावा या युद्धतंत्रावर जास्त विश्वास करत होते आणि सगळ्यांना भीती वाटत होती की ते मराठी तर नाही ना येणार,
महाराज आणि त्यांचे मावळे एक एक करत जहागिऱ्यांना आदिलशहाच्या गुलामीतून स्वतंत्र करत होते आता हिरडसला स्वराज्यात मिळवणं शिल्लक होतं आणि कोणत्याही परिस्थितीत महाराजांना कृष्णाजी बांदलला हरवून रोहिडा किल्ला पाहिजे होता आणि बांदलांचं भोसले घराण्याशी मात्र आधीच वैर होतं आणि या दुश्मनीला मिटवण्यासाठी तानाजी ,आबाजी, येसाजी या मावळ्यांसोबत गनिमी काव्याचा वापर करत महाराजांनी स्वतः कृष्णाजी बांदलला मारले आणि या विजयावर खुश होत आबाजीने म्हटलं की राजे हिरडस आता स्वराज्याचा भाग झालाय परंतु;
इतक्यात पाठीमागून आवाज गरजला जोपर्यंत बाजी जिवंत आहे तोपर्यंत रोहिडा अजिंक्यच राहील आणि तितक्यात आबाजीने मागे वळत महाराजांना म्हटलं की महाराज तुमचा आदेश असेल तर मी आताच याला यमसदनी पाठवतो; नाही आबाजी बाजीशी तर आम्ही लढू ,काळीकुट्ट रात्र डोंगरात वसलेला तो अजय किल्ला रोहिडा दुर्ग आणि चारही बाजूंना पसरलेली भयान शांतता सगळ्यांच्या नजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभू यांच्यावर होत्या एका बाजूला तानाजी,आबाजी आणि दुसऱ्या बाजूला होते बाजीप्रभू.
बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात प्रतापी साहस बघत होते एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात दांडपट्टा प्रतापी तेजमय चेहरा पिळदार मिशा आणि भरभक्कम शरीराच्या बाजीप्रभूकडे शिवाजी महाराज चालत आले इतिहास आता बदलायला चालला होता कारण दोन्ही रणधुरंधर योध्द्ये समोरासमोर उभे ठाकले होते. किल्ल्याची ती काळी रात्र आणि चांदण्या प्रकाशात उभ्या दोन महावीरांमध्ये युद्धाला सुरुवात होणार होती.
छत्रपती सोबत असलेले तानाजी मालुसरे येसाजी कंक आणि आबाजी यांना रोहिडावर भगवा ध्वज फडकण्याची स्पष्टता दिसू लागली होती परंतु बाजीप्रभूंना किल्ला पराजित होत असल्याची चिन्हेही दिसू लागली होती कारण त्यांनाही याची अनुभूती झाली असावी की छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र पाऊल या किल्ल्यावर पडताक्षणीच परकीयांच्या तावडीतून हा किल्ला स्वतंत्र झाला होता आणि बाजीप्रभूंचं काम होतं की शत्रूच्या आक्रमणापासून किल्ल्याचे रक्षण करायचं परंतु दुर्दैवाने शत्रूपक्षात दस्तुर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज उभे होते पण मराठा कधी चुकत नाहीत एका हातात दांडपट्टा व एका हातात तलवार घेऊन युद्ध करण्यासाठी हा मर्द मराठा तयार होता .
(Panhala fort/Photo Credit:Google)
परंतु छत्रपती शिवाजी महाराज फक्त लढण्यासाठीच नाही तर आपल्या दूरदृष्टीमुळे ही ओळखले जातात आणि त्यांनी एकाकी आपली तलवार म्यानात ठेवून दिली हे बघून तानाजी ,येसाजी, आबाजी चकित होतात कोणाला काही समजत नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज बिना तलवारीचं दांडग्या बाजीप्रभूंशी कसं युद्ध लढणार छत्रपती शिवाजी महाराज विना तलवार बाजींच्या दिशेने जाऊ लागले तिकडे हे बघून बाजीही बेचैन होते बाजीप्रभू काय करणार इतक्यात शिवाजी महाराज म्हटले की आम्ही भवानी तलवार एवढ्यासाठी थोडीच वापरत आहे ज्याने आमच्याच मोठ्या भावाला इजा होईल. नवयुवक बाजी ,शिवाजी महाराजांची गोड वाणी ऐकून अचंबित झाले .
छत्रपती त्यांना समजावतात की ज्या कृष्णाजी बांदलने तुमच्या परिवाराला संपवले त्याच्यासाठीच तुम्ही काम करत आहात बारा मावळावर श्री. शहाजी महाराजांचा हक्क होता तुम्ही प्रजेचे दिवाण होते कृष्णाजीने यापेक्षा अधिक तर वसूल करूनच तुम्हाला दोषी ठरवलं आहे शिवाजी महाराज बाजीला समजावतात की कृष्णाजीला मारून ते या प्रांतावर आपला अधिकार नाही जमवू इच्छित हे ऐकून बाजीप्रभू समजून जातात की ते चुकीच्या पक्षाकडून लढत आहेत.
पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मला तुमचं राज्य नाही तर तुम्ही हवे आहात अशा प्रकारे बाजीप्रभू हिंदवी स्वराज्यात सामील होतात तिथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हिरडस मावळ प्रांत परप्रांतीयांपासून स्वतंत्र झाला होता.पूर्वीच्या किल्ल्यासोबत बांदल सेना बाजीप्रभूंचे छोटे भाऊ फुलाजीप्रभू हे सर्व शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले इथे शिवाजी महाराजांची रणनीती माहिती पडते त्यांनी आधी छोट्या प्रांतांना आदिलशहाच्या तावडीतून स्वतंत्र केले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य तर वाढायला तर लागलंच परंतु त्यासोबतच बाजीप्रभू सारखे मातब्बर मावळे त्यांच्यात सामील होऊ लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा परिचय यावरूनच येतो की त्यांच्या लढण्याऐवजी शेकडो आपल्यासारख्या मावळ्यांना एक केलं आणि मग मुघलांचा सामना केला बाजीप्रभू आणि बांदल सेनेची साथ मराठा सेनेसाठी मौल्यवान होतीच छत्रपतींचे म्हणणं होतं की बाजीप्रभूंनी रोहिडा किल्ला आणि बारा मावळला मजबूत करावं जुन्या किल्ल्याचे पुनर्निर्माण आणि गरजेच्या हिशोबाने सैन्याचा अभ्यास करणे राज्यासाठी फायद्याचे होते बाजीप्रभूंच्या देखरेखी खाली खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल दिसू लागला तर नमूद करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बाजीप्रभू हे छत्रपतींच्या सेनेचा भाग होते परंतु त्यांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बोलावत तेव्हा बाजीप्रभू आपल्या भावासोबत रायगडावर येत असत.
अफजल खान वधाच्या वेळी अन्य मावळ्यांसोबतच बाजीप्रभूंची देखील महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी बरेचसे किल्ले आपल्या अधीन केले होते आणि मराठ्यांचा वाढता दबदबा बघत आदिलशहा पिसाळला होता आणि त्याने छत्रपती शिवरायांना पकडण्याचा बेत आखला आणि त्यासाठी त्यांने आपल्या सर्वात शूर सैनिकांचे प्राण पणाला लावले सिद्धी जोहर, रुस्तम ए जमाल, फजल खान आणि सिद्धी मसूद हे होते.
फजलखान हा तोच होता ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दया दाखवून त्याला सोडून दिले होते खरंतर अफजलखान वधानंतर मावळ्यांनी अफजलखानाचे शिपाई आणि त्याच्या दोन मुलांना पकडलं होतं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडून बंदी बनवलेल्या सर्व कैद्यांना मानासोबत सोडून देण्यात आले त्यानंतर अठरा दिवसांच्या आतमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला तिथे काही दिवसांसाठी थांबले आदिलशहाचा हा पराभव इतका मोठा होता की त्यांनी मागचा पुढचा कसलाच विचार न करता रणनीती बनवण्यास सुरुवात केली सिद्धी जोहरने लगेच पन्हाळ्याला वेढा टाकला यादरम्यान शिवाजी महाराजांसोबत बाजीप्रभू देशपांडे व नेताजी पालकर हे दोन योध्द्ये होते पन्हाळा किल्ला खूप मोठा होता इतका मोठा किती तिथे लपून बसलेल्या व्यक्तीला शोधून काढणे खूपच कठीण काम होतं सह्याद्री पर्वत रांगेत बसलेला हा किल्ला सिद्धी जोहर साठी काही नवीन नव्हता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे जाणे प्रत्येकासाठी सोपं नव्हतं. (Ghodkhind/Pawankhind/Photo Credit:Google)
चारही बाजूंनी मिळालेल्या आव्हानांसाठी छत्रपती शिवाजी महाराज तयार होते. नेताजी पालकरांच्या चलाखीमुळे मराठ्यांनी शत्रू सेनेला चकमा देत छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर यायला रस्ता बनवला परंतु शत्रू निघून गेल्याची बातमी कळताच आदिलशाही सेना पांगली गेली आणि महाराजांना शोधू लागली.
नक्की वाचा:१० लाख मुघल विरुद्ध ४० शिखांमध्ये झालेलं चमकौरच भयानक युद्ध.