मित्रांनो आम्ही अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहोत. जे पूर्ण जगभरासाठी धाडस तसेच प्रेरणेचं उदाहरण आहे. ज्यांनी आपल्या कामाने पूर्ण जगाला सांगितलं की अजूनही माणुसकी नावाची गोष्ट या जगात शिल्लक आहे आणि दुसऱ्यांची मदत करणारे आणि त्यांचे दुःख समजून घेणारे लोक अजूनही जिवंत आहेत,
तर खरच मित्रांनो आम्ही बोलत आहोत श्रीकांत बोला यांच्याबद्दल जे आपल्या जन्मापासून नेत्रहीन होते आणि या शारीरिक कमतरतेमुळे त्यांना सुरुवातीपासूनच समाजातील भेदभावाचा सामना करावा लागला. परंतु या सर्व गोष्टींना दुर्लक्षित करून साहस आणि जिद्दीने त्यांनी समाजातील लोकांना आरसा दाखवला आणि फक्त 23 वर्षांच्या वयात पन्नास कोटींची कंपनी उभी केली आणि एवढेच नाही तर त्यांनी आपल्यासारख्या हजारो दिव्यांगांना नोकरी दिली आणि सन्मानाने आपल्या हिंमतीवर जगायला शिकवलं.
तर चला श्रीकांत बोला यांच्या जीवनप्रवासाला अगदी सुरुवातीपासूनच जाणून घेऊयात श्रीकांत यांचा जन्म 1922 मध्ये आंध्रप्रदेश मध्ये एका छोट्याशा गावात सीतापुरम मध्ये झाला होता, परंतु जेव्हा ते जन्माला आले होते तेव्हा त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण नाही तर थोडं उदास वातावरण होतं कारण ते नेत्रहीन जन्माला आले होते आणि ते जन्माला आल्यामुळे गावातल्या लोकांनी त्यांच्या वडिलांना हे सांगितलं होतं की हा मुलगा काहीच कामाचा नाही याला तर मारून टाकलं पाहिजे नाहीतर पुढे जाऊन हा तुमचा आधार बनण्याऐवजी हा तुमच्यावरच ओझं बनून राहील
नक्की वाचा:“संपूर्ण जगाला आपल्या कार्टूनने वेड लावणारे वॉल्ट डिस्नी “
परंतु आई-वडील कसेही का असू देत कोणत्याही परिस्थितीत का नाही असू देत परंतु ते आपल्या मुलांसाठी असा विचारही कधी करू शकत नाही आणि त्यांनी हा विचार पूर्णपणे फेटाळून लावला. श्रीकांत यांचा पूर्ण परिवार हा शेतीवरती अवलंबून होता आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती असं नाही; त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि एका सामान्य मुलाप्रमाणे त्यांनाही शिक्षणासाठी एका शेजारच्या सरकारी शाळेत पाठवलं,
परंतु तिथं श्रीकांत नेत्रहीन असल्याच्या कारणामुळे इतर मुलांसोबत मिळून अभ्यास करू शकत नव्हते त्यांना कायम वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसवले जायचे आणि ते शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकत नव्हते कारण की लोक नेहमी त्यांना हीन भावनेतून बघत असत श्रीकांतच्या लहानपणीचे काही दिवस अशा पद्धतीने गेले आणि त्यांचे वडील त्यांना त्यांच्यासोबत शेतात घेऊन जाऊ लागले जेणेकरून ते त्यांच्या वडिलांची मदत करू शकेल, परंतु तिथेही ते त्यांच्या वडिलांची काहीच मदत करू शकत नव्हते परंतु श्रीकांतच्या वडिलांना माहीत होतं की श्रीकांतला शिक्षणाची जास्त गोडी आहे
त्यामुळे त्यांनी श्रीकांतला शहरात पाठवून त्यांचे ऍडमिशन हे एका नेत्रहीन मुलांच्या शाळेत केलं जिथे श्रीकांत काही महिन्यांतच अभ्यासात चांगली कामगिरी करू लागले आणि फक्त चांगलंच नाही तर आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते लवकरच आपल्या शाळेचे टॉपर बनले
(Srikanth Bolla Received an award from the former Precident of India/Photo Credit: Google)
नक्की वाचा:प्रचंड नफ्यात असूनही अतिआत्मविश्वास आणि योग्य नियोजन नसल्यामुळे डबघाईला आलेली कंपनी BYJUS