“जगात माणसाला प्रत्येक गोष्ट मिळू शकते फक्त एक गोष्ट मिळू शकत नाही ती म्हणजे व्यक्तीची चूक”
एक व्यक्ती कमालीची पेंटिंग बनवत होता आणि त्याची पेंटिंग पाचशे रुपयांना विकली जात होती आणि अशा तऱ्हेने तो दररोज एक पेंटिंग बनवत होता आणि महिन्याचे जवळपास पंधरा हजार रुपये कमावत होता त्याचे हे काम व्यवस्थितपणे चालू होते आणि त्याचं आता वय होऊ लागलं होतं त्याचे हात थरथर करू लागले होते त्यामुळे त्याला वाटलं की त्याची जी कला आहे, त्याची प्रतिभा आहे त्याच्या मुलाला शिकवली जावी.
म्हणून त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि त्याला म्हटलं की ही कला मी तुझ्या आजोबांकडून शिकलो होतो आणि ती कला तू शिकावीस ही कला पिढी दरपिढी चालत आलेली आहे तिला तू पुढे चालू ठेवावीस यातून तुला मिळकत येत राहील तेव्हा त्याच्या मुलाने म्हटले ठीक आहे आपला आदेश आहे म्हटल्यावर तो मानावाच लागेल असे म्हणून त्या मुलाने पेंटिंगची कला शिकण्यास सुरुवात केली.
कशाप्रकारे रंग वापरावे लागतात कशाप्रकारे विचार करावा लागतो कसा विचार केला म्हणजे जबरदस्त पेंटिंग तयार होईल मुलाने चांगली मेहनत करून एक पेंटिंग बनवली सकाळी जाऊन बाजारात विकून आला आणि आल्यावर वडिलांना म्हणाला की पेंटिंग तर विकली पण मजा नाही आली वडिलांनी म्हटलं, विकली म्हटल्यावर खूश तर व्हायला पाहिजे तर त्याने म्हटले शंभर रुपयांनाच विकली आहे पण तुम्ही तर पाचशे रुपयांना विकता मला ती पाचशे रुपयांची पेंटिंग बनवायची आहे वडिलांनी म्हटले की तू नीट बाजार केला नसेल तुला नीट विकता आली नसेल मी तुला व्यवस्थित कसे विकायचे ते शिकवतो.
थोडेफार कौशल शिकवले थोडंफार तरबेज केलं आणि नंतरची पेंटिंग बनवून तो बाजारात विकण्यासाठी गेला त्यावेळी ती पेंटिंग दोनशे रुपयांची विकली होती परत आला आणि आतासुद्धा म्हणत होता की बाबा तुम्ही नक्कीच पाचशे रुपयांना पेंटिंग कशी विकायची ते सांगत नाही आहात काहीतरी लपवत आहात ही कोणती गोष्ट आहे ज्यामुळे पेंटिंग पाचशे रुपयांना विकली जाते.
वडिलांनी अजून काही गुण शिकवले कशाप्रकारे रंग मिसळले जातात परत तो बाजारात गेला आता यावेळेस ती पेंटिंग तीनशे रुपयांना विकली गेली परत आला म्हणाला बाबा मी उदास आहे पेंटिंग पाचशे रुपयांना नाही विकली अजूनही तुम्ही काहीतरी लपवत आहे मला पाचशे रुपयांना कशी विकायची ते शिकवा यावेळेस तो चांगली कमालीची पेंटिंग बनवून बाजारात गेला आणि त्या दिवशी त्याची पेंटिंग सातशे रुपयांना विकली गेली परत आला खुश होता रात्री वडिलांनी विचारले काय झालं तर मुलगा म्हणाला पप्पा आज मी खूप खुश आहे आज पेंटिंग सातशे रुपयांना विकली गेली मजा आली खूप खूप धन्यवाद तर वडिलांनी म्हटले अभिनंदन..!
परंतु आज मी तुला पेंटिंग हजार रुपयांना कशी विकायची ते शिकवणार आहे त्यावर मुलगा म्हणाला तुम्ही मला शिकवू शकणार नाहीत कारण तुम्हीच स्वतः पाचशे रुपयांची पेंटिंग विकत होते मी तर सातशे रुपयांची पेंटिंग विकली आहे ही गोष्ट ऐकून त्या पेंटरने म्हटले जो की आता वयस्कर झाला होता की असं वक्तव्य मी देखील केलं होतं मी ही पाचशे रुपयांना पेंटिंग विकायला तुझ्या आजोबांकडून शिकलो आहे जेव्हा ते पाचशे रुपयांना पेंटिंग विकत होते एक दिवस मी पेंटिंग पाचशे रुपयांना विकली तर आल्यावर ते मला म्हटले की मी तुला आज पाचशे रुपयांना पेंटिंग कशी विकायची ते शिकवणार आहे त्यावर मी म्हणालो की तुम्ही तर स्वतःच तीनशे रुपयांना पेंटिंग विकत आहात तुम्ही मला काय शिकवणार आणि त्या दिवशी मी शिकणं बंद केलं आणि तू देखील शिकणं बंद केलं तर तुझी पेंटिंग सातशे रुपये वरच अडकून राहील.
आपली आजची परिस्थिती अशीच आहे आपल्याला जर काही यायला लागलं आपण काही शिकलो तर आपल्याला वाटतं की बस झालं आपल्याला पुढचं काही शिकायची गरजच नाही आणि त्यामुळे आपली प्रगती थांबते आणि आपल्याला जीवनात जे पाहिजे ते मात्र मिळत नाही आणि खूप सारे लोक म्हणतात की मी आयुष्यात यशस्वी का होत नाही त्यामुळे शिकत चला प्रत्येक व्यक्तीमध्ये असं काहीतरी आहे जो तुम्हाला शिकवू शकेल त्यामुळे शिकत चला वाढत चला.