तुम्ही जर हाॅलिवुड चित्रपटाचे चाहते असाल आणि ते आवडीने पाहत असाल तर तुम्हाला १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला “द मास्क” हा चित्रपट नक्कीच माहित असेल त्यातील अफलातून भुमिका गाजवलेला मुख्य अभिनेता “जिम कॅरी” याची या चित्रपटातली भुमिका खूपच गाजली होती जशी त्याची चित्रपटातली भुमिका त्याहूनही अधिक रोचक आणि प्रेरणादायी कहाणी त्याच्या खऱ्या आयुष्यातली आहे.
(JIM CARREY PLAYED MAIN ROLE IN THE MASK MOVIE/PHOTO CREDIT:GOOGLE)
स्वत:हून जिंकणाऱ्यांना माझा सलाम. जिम कॅरीच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस असे होते की त्यामुळे ते लवकर शिकले होते की थांबणे हा पर्याय असू शकत नाही. हार मानण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांना वाटायचं . जिम आपल्या वडिलांबद्दल सांगतात की माझे वडील एक चांगले कॉमेडियन बनू शकत होते त्यांच्यात अभिनय आणि वेळेची समज होती परंतु वडिलांनी कधी स्वतःवर विश्वास केला नाही;
त्यांना वाटत होतं की दिखाव्याचा व्यवसाय खूप जोखमीचा आहे या कारणाने त्यांनी एक अकाउंटंट म्हणून नोकरी केली तेव्हा जिम कॅरी बारा वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले बहुतेक ते कधीच अकाउंटिंग मध्ये मन लावू शकले नाही त्यामुळे ,
जिम म्हणतात की ज्या कामात मी मन लावू शकत नाही त्यात तुम्ही तसं पण अयशस्वी राहाल त्यापेक्षा चांगलं हे होईल की तुम्ही स्वतःला त्या कामात झोकून द्या ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करतात जो उत्साह तुम्ही स्वतःच्या कामात आणि अभ्यासात जाणवतो तो तुमच्या जीवनाच्या इतर भागांत पसरतो आणि तुमचं पूर्ण जीवन उत्साह आणि ताकदीने भरून जातं
या नायकाचा जन्म १७ जानेवारी १९६५ ला एका गरीब कुटुंबात सफाई कामगाराच्या पोटी झाला.वडिलांची नोकरी गेल्यानंतर जिमने त्यांच्या दोन बहिणींसोबत पूर्ण परिवाराने आपलं घर गमावलं आणि मग पूर्ण कॅरी परिवाराने दुसऱ्या शहरात स्टील फॅक्टरीत देखरेख आणि साफसफाई चे काम केलं त्यावेळी ते एका व्हॅनमध्ये राहत होते.
(JIM CARREY/PHOTO CREDIT:GOOGLE)
(JIM CARREY/PHOTO CREDIT:GOOGLE)
फॅक्टरीमध्ये दहा बारा तास काम करायचे आणि वेळ मिळाल्यावर शाळेत जायचे ,जेव्हा जिम दुसऱ्या मुलांना खेळताना बागडताना बघत तेव्हा त्यांना आपल्या परिस्थितीवर खूप राग यायचा त्यावेळी त्यांची आई पण काळजीमुळे नैराश्यात गेली ती दिवसभर झोपून राहायची एवढे सगळे असतानाही जिमने कधीही आपली स्वप्नं सोडली नाहीत. जिम शाळेतून आल्यावर आपल्या आईला विनोद ऐकवायचा आणि हसवायचा प्रयत्न करायचा शेवटी आपल्या परिवाराची मदत करण्यासाठी त्यांनी पूर्णवेळ साफसफाई करण्यास सुरुवात केली त्यामुळे
जिम कॅरीला तेरा वर्षांच्या वयात शाळा सोडावी लागली दोन वर्ष तयारी करत पहिल्यांदा त्यांनी एक स्टेजवर विनोदी पात्रासाठी सहभाग घेतला परंतु त्यात त्यांना इतकं नापसंत केलं गेलं ते स्टेजवरून पळण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमात तीन वेळा गाणे वाजवले गेले नंतर शेवटी लोकांनी ओरडून ओरडून त्यांना स्टेजवरून पळून लावले पंधरा वर्षाच्या मुलाला जो कधीही व्यवस्थित वाचू लिहू शकला नाही तो एका यांचा कॉमेडी होता जो आपल्या परिवारासाठी पैसे कमावू इच्छित होता त्यासाठी हा एक मोठा झटका होता.
परंतु जिम थांबले नाहीत कारण की त्यांनी हार मानण्याचे परिणाम आपल्या आयुष्यात पहिले होते.परिस्थिती एवढी खराब की घराचं भाडं द्यायला पैसे नाहीत म्हणून ते किराया देऊन खटारामध्ये राहत.परिस्थिती खराब असूनही तो नियमितपणे शाळेत जात होता त्याच्या शाळेतल्या मॅडमने त्याच्यासाठी एक अट घातली होती की जर तू पूर्ण वर्गात शांत बसला तर शेवटचे पाच मिनिट त्याच्यातले कर्तब दाखविण्यासाठी दिले जाईल त्यच्यातल्या कलाकाराला संधी मिळतेय म्हणून तो संपूर्ण वर्गात शांत बसून राहायचा आणि त्या पाच मिनिटांसाठीच शाळेत नियमित जायचा .
जिमला आपल्या कलागुणांच्या जोरावर इतरांना आनंदी ठेवण्यात तसेच हसवण्यात मजा वाटायची इतरांना खळखळून हसवणारा जिम मात्र आतमधून डिप्रेशनचा बळी ठरला होता त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला औषधे घ्यावी लागत,त्याची प्रेमिकाही त्याला सोडून गेली होती ,त्याच्या आयुष्यातील मानसिक तसेच इतर समस्यांना तो पुरा कंटाळून गेला होता त्याला या सर्वांतून बाहेर पडणं गरजेचं झालं होतं म्हणून त्यानंतर तो आपला जन्म कुठे झाला आणि आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याच्यात जास्त अडकून राहिला नाही आणि त्या कठीण परिस्थितीपुढे त्याने हात न टेकता मोठी स्वप्नं पहायला सुरुवात केली कारण स्वप्नं पहायला पैसे थोडेचं लागतात. आणि या पठ्ठ्याने चक्क लहानपणीच मोठा हाॅलिवुड स्टार होण्याचं स्वप्नं पाहिलं चित्रपटात लहानसहान कामे त्याला मिळत होती पण त्यात त्याचं समाधान होत नव्हतं ,
नक्की वाचा:५ लाख पर्शियन विरुद्ध ३०० स्पार्टन्स
ते म्हणतात की मी प्रत्येक रात्री “मुलहॉलांड” पर्वताच्या शिखरावर जायचो आणि तिथून संपूर्ण शहराला पाहायचो की अनेक दिग्दर्शक मला त्यांच्या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहेत मी बघायचो की मी ज्या अॅक्टर आणि दिग्दर्शकांचा आदर करायचो ते सर्व म्हणायचे की आम्हाला तुमचं काम आवडले आणि मला जाणवायचे की मी एक सफल अभिनेता बनलो आहे शहरातल्या मोठ्या स्टुडिओत चांगलं काम करत आहे एक दिवस ते त्यावेळी म्हणायचे की मला चांगलं काम मिळत आहे आणि मी मन लावून मेहनत करत आहे ते म्हणतात की या जगात तीव्र इच्छा असल्याशिवाय कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही आपल्यात लपलेले जे विचार असतात तेच समोर येत असतात.
म्हणून त्यासाठी त्याने १ कोटी डॉलर्सचा स्वत:च्याच नावाचा चेक लिहून आपल्या पाकिटात ठेवला ज्यावर पाच वर्षांनंतरची तारीख टाकली त्या चेककडे बघून त्याला रोज अनामिक ऊर्जा मिळायची. आणि त्यादृष्टीने तो काम करायचा पहिल्या अपयशानंतर जिम दोन वर्ष मेहनत करत राहिले आणि पुन्हा परत एकदाच क्लब मधल्या लोकांना त्यांनी खूप हसवलं नंतर 1987 मध्ये ते लॉस एंजलिसला निघून गेले तिथे पुढचे पाच वर्षे त्यांनी खूपच अडचणीत काढले.
(Dumb And Dumber Movie poster/Photo Credit:Google)सतत दहा- बारा वर्षे चित्रपटात छोटी-मोठी कामे करता करता त्याला एक दिवस एका मोठया चित्रपटात काम करण्याची आॅफर आली चित्रपटाचं नाव होतं “डंब & डंबर” आणि त्याला त्यासाठी देण्यात आलेली रक्कम होती फक्त १ कोटी डॉलर्स. जिवन म्हणजे निवड करणे आलेल्या दु:खात खचून न जाता मोठीमोठी स्वप्नं पाहणं आणि ज्यांनी आयुष्यात मोठी उंची गाठलीय त्या सर्वांनी मात्र हेच केलं,मोठीमोठी स्वप्न पाहिली आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी झपाटून गेले.
आज नाहीतर उद्या करू नाही जमलं तर सोडून देऊ अवघड आहे समजत नाही, नाही होत असे कितीतरी आपण आपल्या मनात हार मानन्याचे अनेक पर्याय बनवून ठेवलेले आहेत कारण आपल्याला माहित नाही की हरण्याचा पर्याय आपल्याला किती कमजोर बनवतो ते या एका पर्यायामुळे आपण प्रत्येक दिवशी कमजोर होण्याची संधी देत असतो जिम म्हणत होते की कोणतीही हार त्यांना मागे खेचू शकत नाही ते नेहमी म्हणतात की कोणतीही हार र आपल्या यशाची व्याख्या ठरवू शकत नाही आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि अपेक्षांचा वापर करून आपण सहजपणे पाहिजे ते करू शकतो.
नक्की वाचा:एक गरीब मेकॅनिक ज्याने कार कंपनी तयार केली “सोईचिरो होंडा “