SOICHIRO HONDA: FOUNDER OF HONDA AUTOMOBILE/PHOTO CREDIT:GOOGLE)
“ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने मे बडे बडे तुफान थम जाते है जब आग लगी हो सीने मै”
असं म्हणणं जगात आपल्या मोटार कंपनीचं नाव मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेल्या “सोईचिरो होंडा” यांचं,होंडा कंपनी प्रत्येक मिनिटाला जवळपास २ कोटी रुपये कमावते. ती आज दुचाकी,चारचाकी कार,खाजगी विमानं एवढाच काय तर रोबोट बनवते , परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची सुरुवात अशा गरीब मुलापासून झाली होती ज्याला लहानपणी साधी सायकलही वापरायला मिळाली नाही. त्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात एका गॅरेजपासून केली.
त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपानमधील शिझुओका या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील घियेल होंडा हे एक लोहार होते जे सायकल बनवण्याचं काम करायचे,तसेच आई शिलाईचं काम करायची . सोईचिरो त्यांना त्यांच्या या कामात मदत करायचे त्यांना अवजाराची आवड होती.त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती कि त्यांच्या ५ बहीण भावंडांची मूलभूत वैद्यकीय काळजी घेतली घेऊ शकली नाही त्यामुळे त्यांनी त्यांना लहानपणीच गमावलं,
(HONDA CLASSIC CAR /PHOTO CREDIT:GOOGLE)
परंतु यातून बाहेर पडण्याचा एकमेव महत्वपूर्ण मार्ग होता तो म्हणजे शिक्षण ते घेऊन मोठं होणं नोकरी करणं परंतु त्यांचं अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं
म्हणून १९२२ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी शिक्षण सोडले. अजूनही एक अशा बाकी होती ती म्हणजे मशीन्स . सोइचीरो होंडा लहानपणी जेव्हा आपल्या आजोबांसोबत राईस मिलमध्ये जात असत त्या मिलमध्ये एक मोटर वापरली जायची जी कि पेट्रोलवर चालायची त्या मोटोरची ठेवणं आणि त्या पेट्रोलचा येणारा वास यामुळे ते त्या मशीनकडे जास्त आकर्षित झाले
कुठंतरी काम करायचं म्हणून त्यांना एका वृत्तपत्रात “आर्ट शोकाई” या मोटार तंत्राच्या कंपनीची जाहिरात दिसली. त्या कंपनीत काम करण्यासाठी त्यांनी टोकियो गाठलं.
नक्की वाचा:कर्माचं भान ठेवायला शिका कारण आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना आपली कर्मचं कारणीभूत असतात.
त्यांच्या वयोमानाचा विचार करता त्यांना त्या कंपनीत सफाई कामगाराची नोकरी मिळाली आणि त्या कंपनीत काम करणारे ते सर्वांत छोटे होते.नंतर त्यांनी त्या कंपनीच्या मालकाला मेकॅनिक म्हणून काम देण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार त्यांना दुसऱ्या शाखेत मेकॅनिक म्हणून पाठवलं गेलं.
१९२३ मध्ये जपानमध्ये एक मोठा भूकंप झाला “The GREAT KATO EARTHQUAKE “असं त्या भूकंपाचा नाव होत त्या भूकंपामुळे संपूर्ण जपानमध्ये मोठी पडझड झाली पोंरंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच भूकंप सोइचीरो साठी नशीबवान सिद्ध झाला . भूकंपानंतर आर्ट शोकाईचे ज्यादातार मेकॅनिक आपापल्या घराला दुरुस्त करण्यासाठी गावाकडं परतले. परंतु गॅरेजमध्ये फक्त सोइचीरो आणि अजून एक कर्मचारी बाकी होते त्यामुळे त्या गॅरेजच्या मालकाला शेवटी काहिकरून सोइचीरोला कार दुरुस्तीमध्ये लावावं लागलं.
(OLD HONDA MOTORCYCLE /PHOTO CREDIT:GOOGLE)
त्याच काम बघून जवळपास सर्वच जण आश्चर्यचकित होते कारण कि ते खूपच लवकर सगळ्यात चांगले मेकँनिक बनले होते
२३ नोव्हेंबर रोजी त्या कंपनीच्या कारने शर्यतीत भाग घेऊन ती शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकली. त्या कारचे मेकॅनिक हे “सोईचिरो होंडा” हे होते .त्यानंतर कंपनीच्या खूप साऱ्या शाखा खोलल्या आणि त्या शाखेचे व्यवस्थापक म्हणून अवघ्या २१ वर्षांच्या सोईचिरोंना निवडलं गेलं.
१९२८ मध्ये होंडांनी ती कंपनी सोडली.आणि स्वत:च मेकॅनिक म्हणून सुरुवात केली त्यात ते मोठमोठ्या कंपन्यांसाठी स्वस्त आणि टिकाऊ रिंग आणि पिस्टन पुरवू लागले. टोकीसिकी ह्या त्यांच्या कारचा शर्यतीमध्ये भाग घेतलेला असताना अपघात झाला ज्यामुळे त्यांना तीन महिने आराम करावा लागला. या अपघाताचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी बनवलेला पिस्टन अपयशी ठरला होता ज्यामुळे त्यांच्यापासून बरेचसे ग्राहक दूर गेले परंतु ते तरीही प्रत्येक कंपनीच्या मालकाची भेट घेऊन पुन्हा सेवेची संधी देण्याची मागणी करत होते.
नक्की वाचा:आपल्या मूळ मालकाची तत्व पाळली नाही म्हणून रसातळाला गेलेली कंपनी “PANASONIC “
१९४४ दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांच्यावर अजून एक संकट कोसळलं ते म्हणजे त्यांची कंपनी पुर्णपणे जळाली. युध्द संपल्यानंतर त्यांनी कसंबसं उरलेले साहित्य आणि इंजिन ४५० येनला विकले.
दुसऱ्या महायुद्धामुळे जपानची अर्थव्यवस्था कोलमडली होती. लोकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत होतं. त्यात त्यांनी होंडा टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट या कंपनीची सुरुवात केली आणि त्या कंपनीद्वारे सायकल चालू शकेल एवढ्या मापाचं इंजिन सायकलला बसवलं जे की त्या लोकांना खूप आवडलं त्या सायकलला त्यांनी “चू-चू” असं नाव दिलं जिची किंमत १५०० रूपये होती.
१९४९ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचं नाव होंडा टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट वरुन “होंडा मोटार कंपनी” असं केलं त्यात त्यांनी २५ स्ट्रोकच्या दुचाकी गाड्या बनवायला सुरुवात केली १९६१ मध्ये या गाड्यांची विक्री दरमहा १ लाख होती नंतर १९६८ मध्ये त्याच गाड्यांची विक्री १० लाख प्रति महिना झाली. त्यानंतर ते कार बनवण्यात उतरले आणि पाहता पाहता तिथेही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं सोईचिरोंच्या यशाचं रहस्य म्हणचे ते आपल्या कामगारांसोबत काम करत कुणालाही हलकी वागणूक देत नसत अशा या महान व्यक्तिमत्वाने ५ आॅगस्ट १९९१ ला जगाचा निरोप घेतला.
![Honda Civic](https://s3.caradvice.com.au/wp-content/uploads/2017/09/civic.jpg)