(Photo credit:Google)
हे जगातील महान खेळाडूंपैकी एक आहेत नाव आहे ”ख्रिस्तीयानो रोनाल्डो”. जे की पोर्तुगालचे एक प्रोफेशनल फुटबॉलर आहेत त्यांना तुम्ही ओळखत असाल किंवा नसाल परंतु फुटबॉल जगतात मात्र यांना इतका मोठा मान आहे की त्यांना फुटबॉलचा साक्षात देव मानला जाते.
छोट्या शहरात जन्म झालेल्या माळ्याचा मुलगा ते आज फुटबॉल जगतातल्या अशा स्थानावरती आज पोहोचले आहेत जिथे पोहोचणं प्रत्येक खेळाडूच स्वप्न राहिलं असावं त्यासाठी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत व इच्छाशक्ती यांचा विचार करणार आहोत.
ख्रिस्तीयानो रोनाल्डो आज अरबो किमतीच्या घरात राहतात करोडो रुपये किमतीच्या गाडीत फिरतात आणि सध्या ते फुटबॉल मधले सगळ्यात महागडे खेळाडू आहेत.त्यांची वार्षिक कमाई 700 कोटींपेक्षा अधिक आहे. परंतु एक वेळ अशी होती की ते एका छोट्याशा पत्र्याच्या घरात राहत होते त्यांच्या मागे खूप मोठा संघर्ष लपलेला आहे याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे चला तर मग या लेखात त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
5 फेब्रुवारी 1985 ला पोर्तुगाल मधल्या फंचल शहरात त्यांचा जन्म झाला त्यांच पूर्ण नाव ख्रिस्तियानो रोनाल्डो डोस सेंटाॅस अवेरो आहे जे की अमेरिकेचे चाळीसवे राष्ट्रपती रोनाल्ड रीगन यांच्या नावावर ठेवलं होतं रोनाल्ड रीगन राष्ट्रपती बनण्यापूर्वी चित्रपटात अभिनेता म्हणून काम करत होते आणि त्यांचे वडीलांचे डिनिस अवेरो हे आवडते अभिनेते होते, ते एक नगरपालिकेचे माळी म्हणून काम करत होते जे की बाग आणि मैदानाची देखभाल करून आपला घर खर्च चालवत असत.
रोनाल्डोच्या अतिरिक्त एक भाऊ आणि दोन बहिणी देखील आहेत ज्यात बहिणींचे नाव इमा, लिलियाना तर भावाचं नाव ह्युगो आहे त्यांचा परिवार खूपच छोट्याशा पत्राच्या घरात राहत होता आपल्या लहान वयापासूनच रोनाल्डोने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती आणि त्यांच्या खेळाचे कौशल्य बघता अवघ्या आठ वर्षे वय असताना स्पोर्ट क्लब मध्ये त्यांना सामील करून घेण्यात आलं
नक्की वाचा:शतकातील सर्वाधिक क्रांतिकारी व्यवसायिक “एलाॅन मस्क”