“सगळ्यांना माहिती आहे आपापल्या कर्माचा खेळ नाहीतर गंगा नदीच्या किनाऱ्यावर असच विनाकारण गर्दी झाली नसती”.
एक छोटीशी गोष्ट आहे रावणाची रावणासोबत जे काही घडलं त्याला समजण्यासाठी आधीची कहाणी समजावी लागेल रावणाची बहीण जिचं नाव होतं शूर्पनखा सुपाच्या आकाराची नखं असल्यामुळे तिचं नाव शूर्पनखा होतं आणि शूर्पनखा विद्युतजीवा नावाच्या एका योद्ध्यावर प्रेम करत होती त्याच्यासोबत विवाह करून बसली होती;
विद्युतजीवा, कालजयी नावाचा राजा होता त्याच्या सेनेचा सेनापती होता आणि रावण जो होता तो संपूर्ण सृष्टीवर आपल अधिपत्य आजमावू पाहत होता संपूर्ण सृष्टीला आपल्या अधिकाराखाली घेऊ पाहत होता संपूर्ण जगाचा मालक व्हायचं असल्यामुळे रावण वेगवेगळ्या राजांना आपल्या अधीन करत होता;
परंतु कालजयीने यास नकार दिला आणि म्हटलं की मी तुझ्या अधीन होऊ शकत नाही, याच गोष्टीवर क्रोधित होत रावणाने कालजयीच्या सैन्यावर हल्ला चढवला त्याला माहिती होतं की त्याच्या बहिणीचा पती त्या सैन्याचा सेनापती आहे म्हणून, परंतु त्याने कोणाचच ऐकलं नाही त्यानी जाऊन विद्युतजीवाचाच वध केला;
जेव्हा ही बातमी शूर्पनखाच्या कानावर पडली तेव्हा ती प्रचंड क्रोधित झाली कारण ज्याच्यावरती ती जीवापाड प्रेम करत होती त्यालाच तिच्या भावाने संपवलं होतं. शूर्पनखा मनात आणूनही रावणांच काहीच बिघडवू शकत नव्हती कारण रावण खूपच बलवान होता.त्यामुळे शुर्पनखाने मनातल्या मनात त्याला शाप दिला की ज्या पद्धतीने तू माझ्या पतीला मारलं आहे माझ्या पतीच्या मृत्यूचं कारण बनला आहेस त्याप्रमाणेच मीही तुझ्या मृत्यूचं कारण बनेल.
नक्की वाचा:“गॅरेजमधून काम करून पुढे येत करोडोंची कंपनी उभी करणारे आबासाहेब गरवारे “