(Photo credit:Google)
“Kodak” ही कंपनी एकेकाळी फिल्म आणि कॅमेरामध्ये जगातलं 80 टक्के मार्केट काबीज करून होती. परंतु फक्त एका चुकीमुळे सर्व काही बरबाद झाले इथपर्यंत की या कंपनीचं आजच्या घडीला नावही ऐकायला मिळत नाही.
ही बातमी ऐकायला आली होती की अमेरिकेतल्या सरकारी एजन्सीकडून “KODAK” 765 दशलक्ष डॉलर्सच कर्ज घेत आहे. ज्यामुळे ते औषधाच्या बाजारात प्रवेश करू शकेल, परंतु प्रश्न हा आहे की ज्याची उत्पादन आनंद वाटत होती त्यांना कॅमेरा सोडून औषध विकण्याची अखेर गरज का पडली.
तर वाचकांनो ही कहानी सुरू होते 1888 मध्ये जेव्हा न्यूयॉर्कच्या राॅजस्टर मध्ये राहणारे “जॉर्ज इस्टमन” कॅमेरा बनवतात ज्याचा आकार खूपच विचित्र आणि तो काळाच्या हिशोबाने खूपच आधुनिक होता “KODAK” कॅमेरा त्यावेळी 25 डॉलरला येत होता आणि त्यात शंभर फोटोंची एक फिल्म होती.
आपल्या या कॅमेर्याला पूर्ण जगभरात पोहोचवण्यासाठी 23 मे 1892 ला जॉर्ज इस्टमन हे “KODAK” कंपनीची सुरुवात करतात आणि इथूनच कोडॅकचा प्रवास सुरू होतो “KODAK” मुख्यतः तीन उत्पादन बनवायचा कॅमेरा त्याची फिल्म आणि तयार फोटोला प्रिंट करण्यासाठी लागणारे पेपर्स इस्टमन आपला कॅमेरा अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात घेऊन जात असत, परंतु सुरुवातीला त्याची काही खास विक्री होत नव्हती त्याला कारण होतं KODAK कॅमेऱ्याची असणारी जास्त किंमत जे की खूप लोकांना परवडत नसे. ज्याला बघता जॉर्ज ईस्टमन आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करतात जे की KODAKच्या यशात मैलाचा दगड ठरतात.
George Eastman :Founder Of Kodak Camera Company. (Photo credit:Google)
तुम्ही रेजर आणि ब्लेडच्या स्ट्रॅटेजीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. ही अशी एक व्यवसाय युक्ती आहे ज्यात कंपनी आपल्या मुख्य वस्तूला कमी किमतीत विकते आणि त्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूंना जास्त किमतीत विकते जसं रेझर बनवणारी कंपनी रेझर अत्यंत स्वस्त दरात विकते परंतु त्यासाठी कायम वापरात येणारं ब्लेड असते ते महाग दराने विकले जाते.
KODAK पण या युक्तीचा वापर करत आणि कॅमेऱ्याची किंमत कमी ठेवत आणि फिल्म आणि प्रिंटिंग पेपर मध्ये जास्त नफा ठेवत. त्यांना आपल्या कॅमेरामध्ये अगदी नाही म्हणण्याबरोबर नफा होत असतो परंतु त्यासोबतच विकल्या जाणाऱ्या फिल्म आणि प्रिंटिंग पेपर मध्ये जवळपास 70 टक्के इतका नफा मिळतो आणि या युक्तीला वापरात आल्यानंतर KODAKची विक्री खूपच जोरात वाढायला लागली तरी त्यांनी अमेरिकेसोबत युके,फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्येही आपली कंपनी वाढवायला सुरुवात केली.
KODAKचा व्यवसाय मोठा तेजीत वाढत चालला होता आणि तो हा कॅमेरा आपल्या जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवत होते परंतु 1908 मध्ये कंपनीत असं काही घडलं की ज्यामुळे कंपनीला नवी दिशा मिळाली आणि यशाच्या शिखरावर नेवून पोहोचवलं यावर्षी थॉमस एडिसन आणि आणखी काही मित्र मिळून मोशन पिक्चर कंपनी सुरुवात करतात त्यावेळी या कंपनीचा अमेरिकेच्या चित्रपट क्षेत्रात चांगला दबदबा होता . जॉर्ज इस्टमन या कंपनीशी डील करण्यात यशस्वी होतात आणि कोडॅक संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एक मात्र पुरवठादार बनून जाते यावेळी कोड्याक आपल्या उत्पादनांना अधिक चांगलं बनवण्यावर भर देत होता आणि त्याच्यावर खूप सारा पैसा खर्च करत होता .
त्यांचा असा दृष्टिकोन होता की ते कॅमेऱ्याला एवढा सोपा बनवू पाहत होते की जसं की पेन्सिलने लिहायचं असतं आणि हेच कारण होतं की जे कॅमेरे प्रोफेशनल स्टुडिओपर्यंतच मर्यादित होते त्या कॅमेऱ्याला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं गेलं त्याकाळी कॅमेऱ्याची लोकप्रियता एवढी होती की एखाद्या लहान मुलाने पहिले पाऊल टाकण्यापासून लग्नापर्यंत कोणताही महत्त्वाचा क्षण होता तो KODAKच्याच कॅमेऱ्याने टिपला जात असे आणि जी कंपनी आपल्या INNOVATIONS मुळे यशाच्या पायऱ्या चढत होती तीच कंपनी पुढे जाऊन या INNOVATION च्या कमतरतेची शिकार होणार होती.
आपण 1888 ते 1968 या कालखंडाबद्दल जाणून घेऊयात या 80 वर्षाच्या काळाला KODAKचा सुवर्णकाळ मानला जात होता या काळात कोडॅक फिल्म व कॅमेरा मार्केटचा जागतिक 80 टक्के हिस्सा काबीज करून होती KODAK जवळ एवढा पैसा होता की कोणतीच कंपनी त्यांच्या समोर टिकू शकत नव्हती आणि जर कोणती कंपनी त्यांची प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहायलाच लागली तर KODAK त्या कंपनीला पाहिजे ती रक्कम देऊन खरेदी करत असे जे की असं होतं की आता ॲमेझॉन, फेसबुक मायक्रोसॉफ्ट, गुगल यासारख्या बलाढ्य कंपन्या करत आहेत यामुळे त्यांनी मार्केटमध्ये आपली एकाधिकारशाही प्रस्थापित केली आहे.
KODAKच्या निर्मितीमध्ये काही रासायने वापरली जात होती जी की इतर कंपन्यांसाठी फायदेशीर होती आणि यामुळेच KODAKने ब्लड लायझर ,एक्स-रे फोटोकॉपी यांसारख्या अनेक वस्तूंची निर्मिती सुरू केली.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी अमेरिका साठी आरडीएक्स आणि हात बॉम्ब सारखी हत्यारं बनवली होती आणि 1943 मध्ये KODAK मॅनहॅटन प्रकल्पाचा हिस्सा राहिली होती आणि हा तोच प्रकल्प होता त्याच्यात पहिला आण्विक हत्यार बनवलं गेलं होतं रेजर आणि ब्लेड युक्तीच्या जोरावर त्यांचा हा व्यवसाय इतके पैसे कमावत होता की KODAK कोणतंही INNOVATION करून मार्केट काबीज करू शकत होती परंतु 1970 पर्यंत त्यांना मिळणार यशच त्यांच्या एवढं डोक्यात गेलं की त्यांनी एक संधी हुकवली की पुढे जात त्यामुळे कंपनी रसातळालाच पोहोचली .
साल १९७५ मध्ये शास्त्रज्ञ STEVEN SASSON यांनी डिजिटल कॅमेरा बनवला ज्यात 0.1 मेगापिक्सलची लेन्स बसवली होती हा एक क्रांतिकारी शोध होता परंतु जेव्हा ते आपला शोध KODAKच्या उच्च अधिकार्यांसमोर मांडतात तेव्हा ते या कल्पनेला लाथाडून लावतात 1979 मध्ये KODAKचे एक मार्केट विश्लेषक LARRY MATTESON एक अहवाल सादर करतात ज्याद्वारे असे सांगितले जाते की 2010 पर्यंत डिजिटल कॅमेरा ट्रॅडिशनल कॅमेरा ची पूर्णपणे जागा घेणार आहे आणि KODAKचे उच्च अधिकारी या अहवालाही गांभीर्याने घेत नाही आणि त्याच जुन्या कॅमेऱ्याच्या विक्रीत गुंतून राहतात.
डिजिटल कॅमेराच्या गोष्टीला गांभीर्याने न घेण्यामागे दोन गोष्टी कारणीभूत होत्या त्या म्हणजे त्यावेळी KODAK खूपच तेजीत चालला होता आणि त्यांचा हा व्यवसाय कॅमेऱ्यावर आधारित नाही तर रोल आणि पेपरच्या व्यवसायावर आधारित होता. ज्याची की डिजिटल कॅमेऱ्यात काहीच गरज नव्हती.
परंतु KODAKला खरा झटका तेव्हा बसतो जेव्हा जपानी कंपनी FUJIFILM अमेरिकेत प्रवेश करते आणि त्यावेळी KODAK जगातल्या सर्वात वरच्या मुख्य कंपन्यांत येत होती फिल्म मार्केटमध्ये या कंपनीचा हिस्सा 95 टक्के आणि कॅमेरा मार्केटमध्ये सर 85 टक्के होता आणि याची विक्री 10 अब्ज डॉलरच्या पुढे पोचली होती, हा त्यामानाने खूपच मोठा आकडा होता ही FUJIFILM जवळ मार्केट हिस्सा नव्हता परंतु त्यांनी आपली उत्पादन क्षमता आणि स्वस्त मिळणाऱ्या कामगारांमुळे त्यांनी कॅमेऱ्याच्या किंमती खूपच घटवल्या होत्या त्यामुळे अमेरिकी बाजारात त्यांची विक्री झपाट्याने वाढत होती.
Fujifilm Classic Camera. (Photo credit:Google)
साल 1984 मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजलिस मध्ये ऑलम्पिक खेळले गेले तेव्हा त्याचा अधिकृत फिल्म लिलाव हा FUJIFILMने जिंकला आणि KODAKच्या ही गोष्ट अजिबात पचनी पडत नव्हती की एक विदेशी कंपनी येऊन त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत आहे.
FUJIFILM बाजारात स्वस्त आणि चांगली उत्पादन आणतचं चालली होती. यावेळी KODAK जवळ मात्र दोन पर्याय होते कंपनी मोठी असल्याचा फायदा घ्यायचा; नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे FUJIFILMचा बदला घेण्याचा प्रयत्न करणे. आणि KODAKने दुर्दैवाने दुसरा पर्याय निवडला आणि मोठी चूक केली तिकडे FUJIFILMने स्पर्धेला बाजूला ठेवत इनोव्हेशन वर भर दिला आणि बाजारात डिजिटल कॅमेराही उतरवला.
नक्की वाचा:उद्याची चिंता करणं सोडून द्या आणि आजचा आनंद घ्यायला शिका.
मागे जाऊन पाहिलं तर १९७५ ला पहिला कॅमेरा हा कोडॅकने बनवला होता परंतु त्यांनी त्यांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटला कधीही पुढे वाढवलं नाही आणि जर तेव्हा योग्य पावलं उचलली असती आणि त्याचा जलद पुढे जाण्याचा फायदा मिळाला असता परंतु इथे KODAK विनाकारण FUJIFILMसोबत स्पर्धा करत राहिला आणि आपल्या व्यवसायाला बिघडून बसली .
KODAK लोकांना हे सांगण्यात गुंतला होती की कसं ट्रॅडिशनल कॅमेरा हे डिजिटल कॅमेरापेक्षा उत्कृष्ट आहेत आणि डिजिटल कॅमेराच्या वापरामुळे ते कोणकोणत्या गोष्टी गमावणार आहेत त्यांचं म्हणणं होतं की डिजिटल कॅमेरातले फोटो कधीच त्यांना ट्रॅडिशनल कॅमेऱ्यात काढलेल्या फोटोइतका स्पर्श आणि आनंद देऊ शकत नाही ही गोष्ट खरी होती परंतु जगभरात डिजिटल साक्षरता जवळजवळ वाढत चालली होती आणि लोकांचा झुकाव डिजिटल कॅमेऱ्याकडे वाढत चालला होता आणि KODAK इथेच आपल्या म्हणण्यावर अडून राहिला आणि गिऱ्हाईकांच्या प्रतिक्रियांना कानामागे टाकू लागला यादरम्यान FUJIFILM हळूहळू मार्केट मधला हिचा 17 टक्के वर घेऊन जाते आणि दोघांच्या शीतयुद्धात जपानी SONY,NIKON,CANON या कंपन्यांचा प्रवेश होतो आणि त्यांच्या वाट्याला थोडा मार्केटचा हिस्सा येतो.अखेर 90 च्या दशकात KODAKपण आपला डिजिटल कॅमेरा बाजारात उतरवतो परंतु याचे उत्पादन इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच खराब सिद्ध होतं .
Cannon First Camera. (Photo credit:Google)
Sony’s First Digital Camera(Photo credit:Google)
2003 पर्यंत डिजिटल कॅमेरा फिल्म कॅमेरा मार्केटला खूपच मागे सोडतो आणि यात आपली पीछेहाट होताना बघून KODAK आपल्या संशोधन आणि विकासावर 200 कोटी डॉलर खर्च करतो आणि 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर भरती करते या सगळ्यांमुळे 2005 पर्यंत पुढे डिजिटल मार्केटमध्ये 40 टक्के हिस्सा मिळवत KODAK पहिल्या क्रमांकावर पोहोचते परंतु KODAK या मार्केटला जास्त दिवसांपर्यंत आपल्या नियंत्रणात ठेवू शकत नाही एकतर KODAKने INNOVATION करणे बंद केलं होतं आणि त्यात आलेल्या जापनीज कंपन्यांनी निकाॅन आणि सोनी आपल्या स्वस्त आणि टिकावू निर्मितीमुळे बाजारात स्वस्त उत्पादन आणत होती .
त्यावेळी “O-PHOTO” नावाची instagram सारखी सेवा देणारी वेबसाईट होती ज्याला KODAKने विकत घेतले परंतु त्या कंपनीला पुढे चालवण्याचा प्रयत्न KODAKने केलाच नाही आणि अशा अनेक चुकीच्या निर्णयामुळे दरवर्षी त्यांना तोट्याचा सामना करावा लागला आणि अखेर 2012 ला KODAK दिवाळखोर बनली KODAKच्या शेअरची किंमत शंभर डॉलर वरून दोन डॉलरवर आली 1996 मध्ये KODAKची उलाढाल 16 अब्ज डॉलर आपल्या सर्वात जास्त उंचीवर पोचली होती आणि त्यांच्या कंपनीत एक लाख 45 हजार कर्मचारी काम करत होते आणि आता विचार केला तर कंपनीची उलाढाल 1.2 अब्ज डॉलर आणि कंपनीत चार हजार दोनशेच कर्मचारी उरले आहेत.
दिवाखोरीतून निघण्यासाठी KODAKने आपले पेटंट आणि लायसन 525 दशलक्ष डॉलर मध्ये विकले होते. 2013 मध्ये ही कंपनी उभी तर राहिली पण जागतिक कॅमेरा मार्केटमध्ये KODAKचा खूप कमी हिस्सा उरला आहे आणि हेच एक कारण आहे की KODAK आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी औषधाच्या क्षेत्रात उतरली आहे,
KODAK नामशेष होण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली सर्वात मोठी चुक त्यांनी भविष्याची पावलं ओळखूनही त्याकडे दुर्लक्ष केलं .कंपनी कितीही मोठी असली तरी त्यांनी हे नाही विसरलं पाहिजे की त्यांचे महत्त्व हे एका ठराविक काळासाठी आहे म्हणून दुनिया ही आजूबाजूला चाललेल्या बदलाला स्वीकारत चाललेली असते आणि जो काळानुसार चाललेला बदल स्वीकारतो तोच टिकतो.