(Photo credit:Google)
मित्रांनो म्हणतात की आपलं वय आणि आपली प्रतिभा यांचा काहीही संबंध नसतो किंवा प्रतिभेला वयाची गरज नसते आपल्यात जर उत्साह असेल तर आपलं किती वय आहे याचा मात्र जास्त काही फरक पडत नाही
आणि या गोष्टीला खरं करून दाखवलंय OYO चे संस्थापक रितेश अगरवाल यांनी. जेमतेम अठरा वर्षांचे असताना भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलीटी सेवा दिल्या जाणाऱ्या खोल्यांचा पाया ठेवला आजच्या स्थितीत ओयो हे उत्तम स्थितीत व्यवसाय करत आहे त्याला खूप वर्ष झाले आहे आणि रितेश यांचे वयदेखील 35 पर्यंत पोहोचले आहे, परंतु सुरुवातीपासूनच रितेश यांनी ज्या उत्साह आणि विश्वासाने काम केले त्याचा हा परिणाम,
की भारतासोबतच चीन मलेशिया आणि पाठोपाठ इंग्लंड, दुबई, सौदी, फिलिपिन्स ,इंडोनेशिया, जपान यांसारख्या देशांमध्ये OYO पोहोचली. आणि या देशातील 500 हून अधिक शहरांत एकूण 45 हजार पेक्षा अधिक रूम्स ओयोच्या उपलब्ध आहेत.
चला तर मग आपण व्यवस्थितरीत्या जाणून घेऊया की एका विद्यार्थ्याने सुरू केलेला उद्योग आज या ठिकाणी पोहोचला आहे की ज्याची स्पर्धा करणारा त्याच्या आजूबाजूला देखील फिरकत नाही.
16 नोव्हेंबर 1993 ला ओडीसा मधल्या अटक बिशाम मध्ये रितेश यांचा जन्म झाला त्यानंतर 12 वी पर्यंतचे शिक्षण “स्केअर्ड हर्ट स्कूल” येथे केल्यानंतर आयआयटीची तयारी करण्यासाठी ते कोटा येथे आले आणि येथे आल्यानंतर ते अभ्यासासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाणं देखील पसंत करत असत त्याचबरोबर कोटामध्ये राहत असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले ज्याचं नाव होतं कम्प्लीट एन्सायक्लोपीडिया ऑफ टॉप हंड्रेड इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि सोळा वर्षाचा असताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये होणाऱ्या आशियन सायन्स कॅम्प साठी रितेशची निवड करण्यात आली होती .
आणि हे एक असं व्यासपीठ होतं की जिथे पूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी कोणत्यातरी विशेष समस्येवर चर्चा करून विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत करत त्यासोबतच रितेश यांना व्यवसाय आणि तंत्रज्ञान संबंधी भाषणाची जास्त आवड होती त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या संमेलनासाठी ते कायम भाग घेत असत ,
त्यामुळे त्यांना जास्त खर्चाअभावी आपल्याकडे असणाऱ्या रकमेनुसारच हॉटेल शोधावं लागत होतं अशा प्रकारे बचत करत करत त्याच्या डोक्यात एक कल्पना आली या दरम्यान रितेश AIRBNB या कंपनीच्या मॉडेलची जास्त प्रभावीत होता AIRBNB ही संस्था एक ऑनलाईन मार्केट आधारित हॉस्पिटॅलीटी पुरवणारी कंपनी होती,
आणि पूर्ण नियोजनासोबतच 2012 मध्ये रितेशने आपला पहिला स्टार्टअप ORAVEL STAYS ची सुरुवात केली, आणि या कंपनीचा मुख्य उद्देश होता की कमी पैशात लोकांसाठी रूम्स उपलब्ध करून देणे आणि ऑनलाईन बुक केल्या जाऊ शकेल रितेशने ही कंपनी सुरू करण्यापूर्वी संपूर्ण माहिती जमा केली होती की त्यांना सर्व माहिती होतं की कशाप्रकारे फंडिंग घ्यावी लागते आणि कसं पुढे जायचं आहे यामुळेच रितेश ला खूप लवकर “व्हेंचर नर्सरी” कडून वीस लाख रुपयांची फंडिंग मिळाली. आता रितेश जवळ व्यवसायाला पुढे नेण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध होते.
नक्की वाचा:उद्याची चिंता करणं सोडून द्या आणि आजचा आनंद घ्यायला शिका.