FOUNDER OF GOOGLE MR. LARRY PAGE.
या लेखात आपण इंटरनेट जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या गुगल कंपनीचे सहसंस्थापक “लॅरी पेज” यांच्या जीवनावरची प्रेरणादायी गोष्ट जाणून घेणार आहोत
कसं त्यांनी “सर्जि ब्रेन” यांच्यासोबत गुगल सारखं सर्च इंजिन बनवलं आणि या शोधाच्या द्वारे त्यांनी आपले जीवन कशाप्रकारे सहज बनवले हे तर आपण सगळेजण जाणतो की गुगल आजच्या घडीला सर्वाधिक यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे आणि हेच कारण आहे की लॅरी पेज हे पण सर्वाधिक यशस्वी व्यक्तींमध्ये मोजले जातात चला तर मग आपण गुगलच्या यशाला सुरुवातीपासूनच जाणू घेऊयात..
“लॅरी पेज” यांचा जन्म २६ मार्च 1973 ला मिशिगन अमेरिकन झाला त्यांच्या वडिलांचे नाव कार्ल व्हिक्टर तसेच आईचं नाव क्लोरिया होतं आणि ते दोघेही तेथील राज्य विद्यापीठात संगणक विषयाचे प्राध्यापक होते त्यांच्या घरात कायमच कम्प्युटर तसेच इंटरनेट संबंधित पुस्तक तसेच मासिकं पसरलेली असत आणि याच वातावरणात वाढल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच कम्प्युटरमध्ये रस निर्माण व्हायला लागला
त्यांनी खूप छोट्या वयात वस्तूंना खोलून समजायला सुरुवात केली ते माहिती करून घेत इच्छित होते की एखादी वस्तू काम कशी करते म्हणून,त्यांनी खूप कमी वेळात हे जाणलं होतं की ते वस्तूंचा शोध लावणार आहेत ही गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती जेव्हा ते बारा वर्षांचे होते तेव्हाचं त्यांनी ठरवलं होतं की ते उद्योजक बनणार म्हणून त्याच्यानंतरच त्यांना व्यवसाय संबंधित जाणून घेण्याची उत्सुकता वाढीस लागली.
नक्की वाचा:भारतातील सार्वजनिक प्रवास सुखकर करणारे ”भाविश अगरवाल”
त्यांच सुरुवातीचे शिक्षण OKEMOS MONTESORY या शाळेतून झालं त्यानंतर त्यांनी 1919 ला East land Highsing मधून आपली पदवी पूर्ण केली आणि पुढे जाऊन स्टॅन्फोर्ड विद्यापीठातून आपली पुढची पदवी तसेच पीएचडी ही तिथूनच करू लागले तिथे त्यांची ओळख सर्जी ब्रेन यांच्याशी झाली जे की सध्या गुगलचे संस्थापक आहेत पीचडी मध्ये त्यांनी वर्ल्ड वाईड वेब हा विषय निवडला आणि अशा शोधात निघाले की जिथे सर्व वेबसाईट एकत्रितपणे आणल्या जाऊ शकतील आणि त्यांच्या प्रसिद्धीच्या आधारावर त्यांना रॅकींग दिली जाऊ शकेल पुढची चार वर्षे दिवसरात्र एक करत त्यांनी जबरदस्त संशोधन केलं आणि शेवटी सप्टेंबर 1996 मध्ये ते अशा अल्गोरीदमला शोधण्यात यशस्वी ठरले.
गुगल हा शब्द गणितामधून घेण्यात आला आहे याचा अर्थ असा की एक या संख्येच्या पुढे शंभर शून्य पहिल्यांदाच गुगलला लॉंच करण्यात आलं होतं ते अजूनही स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत पुढे जाऊन आपले मित्र नातेवाईक आणि गुंतवणूकदार यांच्याकडून दहा मिलियन डॉलर कर्ज घेत त्यांनी गुगल INC. या कंपनीची स्थापना केली आणि आपल्या अल्कोरीदम आणि एकमेवाद्वितीय संकल्पनेच्या जोरावर कंपनीने खूप सारे यश संपादन केलं आणि सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन बनलं गेलं इथूनच लॅरी आणि त्यांच्या मित्राने कधीही मागे वळून पाहिले नाही.
आणि यापुढे काही वर्षांनी 2004 मध्ये गुगलचा आयपीओ शेअर मार्केटमध्ये उतरवण्यात आला जिथे लोकांनी भरभरून गुंतवणूक केली आणि अशा तऱ्हेने गुगल इंटरनेट जगतातील सर्वात मोठी कंपनी बनली आणि या कंपनीला बनवणारे लॅरी पेज व सर्जी ब्रेन हे अब्जाधीश तरुण बनले.
१४ नोव्हेंबर 2006 ला गुगलने आत्ताचं सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी व्हिडिओ लायब्ररी युट्युब ला विकत घेतलं त्यासोबतच 26 एप्रिल 2019 ला गुगल द्वारे पहिली अँड्रॉइड प्रणाली लॉन्च करण्यात आली जी की दुनिया भरातल्या अब्जावधी मोबाईलमध्ये आहे गुगल सर्च इंजिन व youtube व्यतिरिक्त गुगलची खूप सारी म्हणजेच जवळपास 50 पेक्षा जास्त उत्पादने आहेत गुगलचं मुख्यालय काॅलिफोर्नियामध्ये आहे आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांचा विचार केला तर लॅरी पेज सातव्या नंबरवर येतात.
त्यांचा वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर 7 डिसेंबर २००७ ला त्यांनी अभिनेत्री कॅरी साउथवर्ती यांची बहीण लुसिडा साउथवर्ती यांच्यासोबत लग्न केले त्या एक संशोधन वैज्ञानिक आहेत आणि त्या दोघांना दोन मुले आहेत.
Google Headquarters in California