आनंद नशिबात पाहिजे फोटोमध्ये तर प्रत्येक जण हसतच असतो.
ही गोष्ट आहे का भक्ताची ज्याच्या आयुष्यात नेहमी काही ना काही समस्या चालू होत्या त्याच्या घरातले नेहमी कोणी ना कोणी आजारी असायचे कामात चांगला पगार मिळत नव्हता काम करूनही बढती मिळत नव्हती कधी कधी तर कामात आपल्या साहेबांशीच भांडण व्हायचं त्याला वाटायचं की माझ्या समस्या कधीच का संपत नाहीये मी तर देवाचा एवढा मोठा भक्त आहे, नेहमी देवाचं नामस्मरण करतो नियमित पूजा पाठ करतो देव माझ्यासोबत वाईट का करतो?
त्याच्या आसपासचे लोकं त्याला प्रोत्साहित करत होती की सगळे काही ठीक होईल तू तर एवढी देवाची भक्ती करतोस तुझ्यासोबत कधी वाईट तर नाही होणार.
नक्की वाचा:“एक माळ्याचा मुलगा ते जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू “ख्रिस्तीयानो रोनाल्डो “
परंतु त्याला देवापासून जरा नाराजी व्हायला लागली होती त्याला वाटत होतं की देवाला पाहिजे तरी नेमकं काय एक दिवस त्याचं कामावर भांडण झालं आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तो घरी आला आणि देवासमोर अर्धा तास बसून राहिला पुजा पाठ करू लागला म्हणू लागला देवा आज तुला माझ्या स्वप्नात यायचं आहे मला दर्शन द्यायचं आहे माझ्याशी बोलायचं आहे तुझा भक्त तुझ्याशी बोलू इच्छित आहे तो आज संकटात आला आहे ,
आणि कमालीची गोष्ट म्हणजे त्या रात्री देव त्याच्या स्वप्नातही आला जसा देव दिसायला लागला तसं त्याने आपल्या समस्यांचा पाढाच देवापुढे वाचायला सुरुवात केली. की मी बघतो माझ्या आसपास चुकीचं काम करणारे मजेत फिरत आहेत आणि मी चांगलं काम करणारा मला एका मागून एक समस्या आहेत मला समजत नाही की नेमकं तुला काय हवं आहे देवा?
त्यावर देव सांगू लागला की हे नैसर्गिक चक्र आहे हा निसर्गाचा नियम आहे तो चालूच राहतो फायदा तोटा सहन करावाच लागतो भक्त म्हणाला मला हे काहीच माहिती नाही मला माझ्या समस्येवर समाधान हवं आहे आणि तेही लगेच भक्ताच्या या वेडेपणाच्या गोष्टी ऐकून देव म्हणाला ठीक आहे तू समाधान मागतोस तर समाधान देतो, तुला तुझ्या मागे एक मोठं वडाचं झाड दिसत आहे ना तिथं एक तुझ्या सर्व समस्यांची भरलेली चिठ्ठी लिहून टाकायची आहेस त्या सर्व समस्या त्यानंतर पूर्णपणे नाहीशा होतील सर्व समस्या संपून जातील.
नक्की वाचा:“जीवनात उमेदीची साथ कधीच सोडू नका.”
1 thought on ““जीवनातील समस्यांचं रडगाणं गायचं बंद करा””