जगात सगळ्यात मोठा गुरु हा ठोकर आहे जेवढ्या तुम्ही ठोकरा खात जाल तेवढेच तुम्ही त्यापासून शिकत जाल.
एकदा एक व्यापारी हिऱ्यांचा व्यवसाय करत होता हिरे विकण्यासाठी तो एका देशातून दुसऱ्या देशात जात असत आपली हिऱ्यांनी भरलेली छोटीशी पिशवी घेऊन तो एकदा जात होता तेव्हा त्याला एका चोराने बघितले आणि त्याने ज्या जहाजाचे तिकीट काढलं त्याच्यातून व्यापारी हिरे घेऊन चालला होता त्याला दोन दिवसांचा कालावधी लागणार होता प्रवासासाठी आणि तिसऱ्या दिवशी तो तिथे पोहोचणार होता;
त्या चोराने विचार केला व्यापारी जेव्हा आज रात्री झोपेल तेव्हा मी त्याच्याकडून ती हिऱ्यांनी भरलेली पिशवी चोरून घेईल. रात्रीची वेळ होती व्यापाऱ्याने जेवण वगैरे केलं त्यानंतर तो आराम करण्यासाठी आडवा झाला परंतु व्यापाऱ्याच्या आधीच चोर झोपी गेला चोराने विचार केला की ,मी फक्त झोपण्याचं नाटक करतो व्यापारी झोपल्यानंतर मी अर्ध्या रात्री उठून व्यापाऱ्याकडून त्याची हिऱ्यांची पिशवी चोरून घेईल चोर झोपला व्यापाऱ्याला पण झोप यायला लागली ,
नक्की वाचा:”वादळापूर्वीची तयारी”
परंतु त्याने विचार केला की कोणीतरी माझी हिऱ्यांची पिशवी घेतली तर माझी झोपच कायमची उडून जाईल आणि त्याने विचार केला या पिशवीला कुठं लपवाव बरं व्यापाऱ्याने थोडसं डोकं लावलं आणि हिऱ्यांच्या पिशवीला त्या चोराच्याच खिशात लपवून ठेवलं आणि त्यानंतर व्यापारी आरामात झोपला.
रात्री उशिरा तो जागा झाला आणि म्हटला चला व्यापाऱ्याचे सामान चाचपडू त्यांने तसं केलं परंतु त्याला तिथे हिऱ्यांची पिशवी काही सापडली नाही त्याने सगळीकडे शोधलं परंतु त्याला ती पिशवी काही सापडली नाही त्याला वाटलं आता सकाळ झाली काही हरकत नाही उद्या शोधूया
नंतरच्या दिवशी तसेच झाले चोराने झोपायचं नाटक केलं रात्री उशिरा उठला परत सामानच चाचपडलं पण त्याला हिरे काही मिळाले नाही चोराने हिरे मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही
आणि अखेर तिसऱ्या दिवशी जेव्हा व्यापाऱ्याला जायचं होतं तेव्हा व्यापारी आपलं सामान घेऊन जाऊ लागला तेव्हा चोर पाठीमागून व्यापाऱ्याच्या मागे आला आणि व्यापाऱ्याला आवाज देऊ लागला की मी चोरी करतो आजपर्यंत मी अनेकांना लुटलं आहे आणि मी हे चोरीचं काम आजपासून कायमचं सोडून देईन फक्त मला हे सांगा
नक्की वाचा:“जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म ”