“या दुनियेत ज्या दिवशी तुम्ही आपले विचार बदलायला सुरुवात केली त्या दिवसापासून तुम्ही मोठमोठ्या लोकांच्या नजरेत यायला सुरुवात होईल त्यानंतर तुम्ही नक्कीच मोठे व्यक्ती बनाल”.
एका भिकाऱ्याची गोष्ट आहे त्याची आपली रोजची दिनचर्या ठरलेली होती सकाळी रेल्वेत बसून एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जायचं एका डब्यातून दुसऱ्या डब्यात फिरत फिरत भीक मागायची पैसे मिळाले तर मिळाले नाही तर आपले असेच दिवस काढत जगत होता’
एक दिवस तो असाच ट्रेनमध्ये बसून भीक मागत एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर चालला होता तेव्हा त्याला एक सुटाबुटातला माणूस दिसला त्याला बघितल्यावर भिकारी त्याच्याजवळ गेला आणि त्याला वाटलं की हा माणूस मला चांगली भीक देऊ शकतो म्हणून त्याच्याजवळ जाऊन तो भीक मागू लागला त्या व्यक्तीने बघितले आणि काही वेळानंतर तो माणूस मोठ्याने ओरडू लागला की मला तुला काही द्यायचंच नाही तरी तू माझ्यामागे का पडलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुला काही देईल परंतु तुझ्याकडे मला देण्यासाठी काय आहे भिकाऱ्याने म्हटले साहेब माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काय असणार मी तर एक भिकारी आहे मी तर भिक मागतो माझी लायकीच काय आहे की मी तुम्हाला काय देऊ शकतो?
त्या व्यक्तीने त्यावर म्हटले की तू जेव्हा देऊ शकतो तेव्हाच मागत जा हे बोलून तो व्यक्ती स्टेशनवर उतरून निघून गेला परंतु हा भिकारी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विचार करू लागला की मी काय देऊ शकतो आणि स्टेशनवर उतरून तो इकडे तिकडे नजर फिरवू लागला त्याला बाजूला छोटी छोटी झाडं दिसली त्याला लागलेली फुलं दिसली आणि त्याने विचार केला की हो तर मग जर कोणी आपल्याला भीक दिली तर आपण त्याला फुलं देऊया,
पुढच्या दिवसापासून त्यांने ही प्रक्रिया सुरू केली कुणी त्याला भीक दिली तर तो त्याला फुलं देत लोकांना पण ही गोष्ट आवडू लागली की चला कोणीतरी भिकारी आहे की जो भीकेच्या बदल्यात फुलं देत आहे ही प्रक्रिया काही दिवस चालू राहिली आणि भिकाऱ्याला तो सुटाबुटात भेटलेला माणूस पुन्हा एकदा दिसला आणि भिकारी पळत जाऊन त्या व्यक्तीला म्हणू लागला की साहेब माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे त्यावर विश्वास करत त्या व्यक्तीने खिशातून काही पैसे काढून त्या भिकाऱ्याला दिले आणि त्यावर त्या भिकाऱ्याने त्या व्यक्तीला फुल दिले त्यावर तो व्यक्ती म्हणाला की तुला आता व्यापार कळू लागला आहे देवाण-घेवाण काय असते जीवनात आपण जोपर्यंत काही देऊ शकत नाही तोपर्यंत काही घेतलं पण नाही पाहिजे असं बोलून तो व्यक्ती पुन्हा एकदा उतरून गेला
नक्की वाचा:“माणसाला मिळालेलं सर्वश्रेष्ठ गिफ्ट “