“सुखी होण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु दुसऱ्यांपेक्षा जास्त सुखी होण्याचा कोणताच मार्ग नाहीये”.
एक कॅब ड्रायव्हर होता ज्याचं नाव होतं व्हॅली आणि एक माणूस होता ज्याने ती कॅब बुक केली होती त्याचं नाव होतं सुखी. सुखी विमानतळावरून बाहेर पडला तो बाहेर आला आणि कॅबची वाट पाहत होता तेव्हा एक चमकती नवी कोरी गाडी तिथे आली आणि त्या गाडीकडे बघून सुखी चमकला की त्याने बुक केलेली गाडी हिच तर नाही ना म्हणून त्याने त्या गाडीचा नंबर चेक केला तर तीच गाडी होती जी त्याने बुक केली होती .
ड्रायव्हर गाडीतून बाहेर पडला आणि त्याने मागचा दरवाजा उघडला आणि एक स्टेटमेंट असलेले पत्र काढून सुखीच्या हातात ठेवलं जे की एक मिशन स्टेटमेंट होतं त्या ड्रायव्हरने म्हटलं की तुमचं सामान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत तुम्ही हे स्टेटमेंट वाचून काढा सुखी जेव्हा हे पत्र वाचू लागला तेव्हा त्यात लिहिलं होतं की मी आपल्याला आपल्या इच्छित स्थळापर्यंत अत्यंत माफक दरात अत्यंत सुरक्षितपणे तेही जलदरीत्या पोहोचवण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही सुखीने विचार केला की कॅब ड्रायव्हर जवळ एवढ्या सुविधा कशा काय!
तो बसायला गेला आणि आश्चर्यचकित झाला कारण गाडी एकदम साफ होती एकदम नवीन गाडी ,सुखी या सगळ्यांचा विचारच करत होता तेवढ्या ड्रायव्हरने विचारले की सर तुम्हाला गाडीचा एसी व्यवस्थित वाटतोय तापमान कमी जास्त करायच असेल तर करू शकता ड्राइवरने म्हटलं हे कार्ड घ्या यावर सर्व गाणी तसेच रेडिओ वाहिन्यांची यादी आहे तुम्ही सांगाल ते गाणं आपण यावर चालवू,
नक्की वाचा:“वाईट झालं म्हणजे असं नाही कि सगळं संपलं; तर त्यातून चांगल्याचीही सुरुवात होत असते”