जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक ज्यांनी अनेकवेळा आपल्या आयुष्यात अपयशाचा सामना केला परंतु ते आपल्या ध्येय्यावरुन थोडेसेही न भरकटता ठाम राहिले आणि सर्वाधिक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले.
“जॅक मा”. यांचा जन्म दि. १० सप्टेंबर १९६४ रोजी चीनच्या एका प्रांतात झाला. त्यांना लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची हौस होती म्हणून त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला कारण त्याकाळी चीनमध्ये प्रामुख्याने आणि फक्त चायनीज भाषाच बोलली जात असे इंग्रजी आणि चीनी नागरिक यांचा दूरपर्यंत संबंध नव्हता काहीही इंग्रजी शिकायची पण ती कशी म्हणून त्यांनी एक चांगला पर्याय शोधून काढला तो म्हणजे चीनमध्ये येणाऱ्या काही अमेरिकन तसेच इतर इंग्रजी भाषिक पर्यटकांना गाईड करण्याचा त्यांनी हे काम सतत ९ वर्षे केलं आणि त्यानंतर ते इंग्रजीमध्ये निपुण झाले.
त्यांचं खरं हे “मां-युं” असं होतं. परंतु त्यांचा इंग्रजी बोलणारा एक चांगला परदेशी मित्र होता ते त्या मित्राला कायम पत्र लिहित त्यात त्यात त्या मित्राने त्यांना “जॅक-मां” हे नाव दिलं.त्यांना लहानपणापासूनच शिक्षणात अजिबात रस नव्हता म्हणून की काय ते चवथ्या वर्गात सलग दोन वेळा नापास झाले. आणि आठवीच्या वर्गात सलग तीन वेळा त्यानंतर कसेबसे ते पदवीपर्यंत पोहोचले परंतु पदवी पूर्ण करेपर्यंत ते तब्बल पाच वेळा नापास झाले सरतेशेवटी १९२८ मध्ये त्यांनी आपली पदवी पूर्ण केली त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीसाठी प्रयत्न केला त्यात ते ३० वेळा अपयशी ठरले .
दरम्यानच्या काळात त्यांनी केएफसी मध्ये नोकरीसाठी आवेदन दिलं. तेव्हा केएफसी नव्यानेचं चीनमध्ये आली होती.त्या कामासाठी एकूण २४ जणांनी नोकरीसाठी अर्ज दिला होता परंतु त्यातील २३ जणांची निवड करण्यात आली आणि फक्त “जॅक-मां” यांनाच नाकारण्यत आलं नंतर त्यांच्या शिक्षणाचा विचार करता त्यांना एका शाळेत प्राध्यापकाची नोकरी देण्यात आली ,नंतर त्यांनी काही काळ दुभाषकाची नोकरी केली.१९९५ मध्ये “जॅक-मां” त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच इंटरनेट पाहिले त्याचा वापर तर फारच लांबची गोष्ट.
“जॅक-मां” यांनी पहिल्यांदा इंटरनेटवर उत्सुकतेपोटी बिअर हा शब्द शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना या शब्दाशी संबंधित अनेक देशातली बरीच माहिती उपलब्ध झाली परंतु त्यापैकी आश्चर्याची बाब म्हणजे चीन या देशाचा बिअरसंबंधी कसलाही उल्लेख नव्हता, बिअरच काय तर चीनसंबंधी इतर कसल्याच प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध नव्हती.त्याचवेळी त्यांना दिसलं की इंटरनेटचा वापर करुन आपण प्रचंड संधी निर्माण करु शकतो. त्यानंतर त्यांनी इंटरनेटचा वापर करुन छोट्या छोट्या दुकानदारांना एकत्र आणत आपल्या एका मित्राच्या मदतीने एक वेबसाईट तयार केली येलो पेज नावाची.
ही एक चांगली उद्योग कल्पना होती परंतु तरीही संपूर्ण चीनमध्ये त्यांना या उद्योगाच्या वाढीसाठी एकही गुंतवणूकदार मिळाला नाही आणि हा उद्योग काही दिवसातच बंद करावा लागला.एवढ्या अपयशांचा सामना केल्यानंतर कदाचितच एखादा व्यक्ती असेल जो की नवीन प्रयोग करण्याची हिंमत करेल परंतु हार मानणारे ते जॅक-मां कसले आणि अगदी काही दिवसातच त्यांनी आपल्या पहिल्या चुकांमधील कमतरता शोधत आपली पत्नी आणि २० लोकांच्या मदतीने एक वेबसाईट सुरू केली आणि नाव दिलं Alibaba.com सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आणि मग त्यांच्या या साॅफ्ट बॅंकेने भरभक्कम गुंतवणूक केली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
अलिबाबा जवळपास सगळीकडे एक मोठी इ-काॅमर्स वेबसाईट म्हणून नावारूपाला आली आणि फक्त ४ वर्षांतच आलिबाबाने ebay.com सारख्या मोठ्या वेबसाईटला देशाच्या बाहेरचा रस्ता दाखवला . आज जॅक-मां यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. आजघडीला त्यांची एकूण …..अब्ज डॉलर आहे त्याकाळी अलिबाबाचं उत्पन्न इबे आणि अॅमेझोनच्या मिळून येणाऱ्या उत्पन्नाच्या बरोबर होतं. अपयश आल्यावर घाबरून न जाता आलेल्या समस्यांना कशा प्रकारे तोंड द्यायला हवं म्हणजे त्या कमी होतील हे समजून घ्यायला हवं कारण वेळ ही कायम प्रत्येकासाठी सारखीच नसते.
आज जर तुम्ही अपयशाच्या अंधारात असाल तर उद्या यशाचा एक किरण तुम्हाला अपयशापासून नक्कीच दूर नेईल . कोणत्याही कामातून जर असफलता तर लगेच निराश नका होऊ. कारण अपयशचं आपल्याला अधिक समजदारीने ते काम पुन्हा करण्याची संधी देते.