![J. K. Rowling](https://wallpapercave.com/wp/wp3635868.jpg)
त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कादंबरी लिहिली आणि जेव्हा ही कादंबरी लिहून पूर्ण झाली तेव्हा कोणीही प्रकाशक या कादंबरीला प्रकाशित करण्यास तयार नव्हता परंतु पुढे जाऊन हि कादंबरी कशी जगातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणून नावारूपाला आली हे तर आपणा सर्वांनाच माहित आहे .
तर या गोष्टीची सुरुवात 31 जुलै 1965 मध्ये इंग्लंडमधील याते येथे झाली म्हणजेच लेखिकेचा जन्म, खरं म्हणजे लेखिकेचं पूर्ण नाव जाॅन कॅथलिन रोलिंग आहे. चार वर्षांच्या असताना या आपल्या आई-वडिलांसोबत एका शेजारच्या गावात राहायला गेल्या जिथे त्यांनी सेंट मायकल कॉलेजमधून शिक्षण घेतले आणि इथल्या प्राचार्यांना लक्षात घेत पुढे जाऊन त्यांनी हरी पॉटर मधलं अल्बस डम्बलडोअर हे पात्र लिहिलं.
रोलिंगला सुरुवातीपासूनच कथा लिहिण्याची फारच आवड होती आणि त्यालाही मनापासूनच आपल्या बहिणीला चित्र- विचित्र कथा ऐकवत असत. पुढे वार्डनिंग शाळेमधून त्यांनी पुढचं शिक्षण घेतले. त्या काळात त्यांच्या काकूंनी त्यांना जेसीका प्रिंटफोर्ड यांची आत्मकथा आणून वाचायला दिली त्याचं नाव हीन्स & रिबल्स होतं या पुस्तकाला वाचल्यानंतर त्या जेसीकाचा चाहत्या बनल्या आणि त्यांनी जेसिकाची लिहिलेली सर्व पुस्तके वाचून काढली.
1982 मध्ये रोलिंग यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेशासाठी परीक्षा दिली परंतु तिथं त्यांची निवड होऊ शकली नाही आणि त्यामुळे त्यांना मजबुरीने एक्टर युनिव्हर्सिटी मधून पदवी पूर्ण करावी लागली त्यानंतर त्यांनी अमनेरी इंटरनॅशनल कंपनीत सेक्रेटरी चे काम केलं आणि मग त्यांनी मँचेस्टर मध्ये राहून चेंबर ऑफ कॉमर्स मध्येही काम केलं आणि
त्या जेव्हा मँचेस्टर वरून लंडनला ट्रेनने येत होत्या तेव्हा त्यांच्या डोक्यात जादूच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची कहाणी आली जी त्यांनी आपल्या मनात पूर्णपणे बसवली आणि जेव्हा त्या आपल्या लंडनमधील कॅम्पसमध्ये परतल्या तेव्हा त्यांनी त्याबद्दल लगेच लिहायला सुरुवात केली काही दिवसांतच त्यांच्या आईचा मृत्यू झाला ज्या की त्यांच्यासोबत जवळच्या होत्या आणि त्या गोष्टीचा परिणाम नक्कीच रोलिंग यांच्या लेखनावर पडला त्या खूप दुःखी राहायला लागल्या परंतु पुढे जाऊन त्यांनी आपल्या दुःखाला विसरण्यासाठी लेखनाचीच मदत घेतली आणि आपला पूर्ण वेळ लिहिण्यात घालवायला लागल्या.
नक्की वाचा:“गॅरेजमधून काम करून पुढे येत करोडोंची कंपनी उभी करणारे आबासाहेब गरवारे “
काही दिवसांनी त्या नोकरीच्या शोधात पोर्तुगालला गेल्या तिथे त्यांना इंग्रजी शिकवण्याचं काम मिळालं. त्या तिथं रात्री शिकवायच्या व दिवसा लेखन करायच्या,
पोर्तुगालमध्ये त्यांची ओळख पत्रकार जॉर्ज ओरिएंट यांच्याशी झाली दोघांचे विचार आपापसात खूप मिळतेजुळते होते आणि त्यामुळे त्यांनी 1990 ला युकेमध्ये लग्न केलं 27 जुलै 1993 ला त्यांना मुलगी झाली तिचं नाव त्यांनी जेसीका ठेवलं, परंतु घरगुती वादांला कंटाळून त्यांनी 17 नोव्हेंबर 1993ला घटस्फोट घेतला आणि नंतर त्या आपल्या मुलीला घेऊन आपल्या बहिणीकडे स्कॉटलंडला गेल्या त्या वेळेपर्यंत त्यांनी हॅरी पाॅटरचे तीन चॅप्टर लिहिले होते.
ही वेळ रोलिंग साठी खूपच दुःखाची होती त्यांचं लग्न झालं होतं एका मुलीची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांच्याजवळ काही कामही नव्हतं त्यामुळे त्या खूप ताणतणावात राहायला लागल्या एक वेळ तर अशी आली की वाढत्या तणावामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला परंतु त्या त्याच्यात असफल ठरल्या. त्यांनी खर्च भागवण्यासाठी वेल्फेअर लावायचा अर्ज भरला ज्याद्वारे ब्रिटिश सरकार घटस्फोटीत एकल पालकांना पैसे देत असत या सर्व समस्यांचा सामना करत असतानाही त्यांनी आपलं लेखनाचं काम बंद पडू दिलं नाही.
आणि अखेर त्यांनी आपलं पहिलं पुस्तक हॅरी पॉटर अँड द फिलासाॅफर्स हे पुस्तक लिहून पूर्ण केलं जे त्यांनी जुन्या टंकलेखकाच्या माध्यमातून तयार केलं होतं आणि प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांकडे घेऊन गेल्या. परंतु तिथेही त्यांना खूप भटकावं लागलं 12 प्रकाशकांनी त्यांचं पुस्तक छापण्यास असंमती दर्शवली. रोलिंगच्या स्वप्नांवर आता पाणी पडल्यासारखं वाटत होतं. परंतु एक वर्षानंतर लंडनच्या एका प्रकाशन हाऊसने ज्याचं नाव होतं “ब्लूम्सबरी” हे अखेर ते पुस्तक प्रकाशित करण्यास तयार झाले परंतु तिथल्या प्रकाशकाला हे पुस्तक जास्त यशस्वी होणार नाही असं वाटल्यामुळे त्यांनी रोलिंगला नोकरी करण्याचा सल्ला दिला परंतु 26 जून 1997 ला जेव्हा पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा मात्र सगळं काही उलटचं पडल्यासारखंच झालं, या पुस्तकाला लोकांनी खूप पसंत केलं होतं आणि पाचच महिन्यांत या पुस्तकाला दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आणि त्यावर्षीचा चिल्ड्रन बुक पुरस्कार देखील मिळाला,
त्यानंतर 2 जुलै 1998 ला हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट आणि 3जुलै 1993 ला तिसरं पुस्तक हॅरी पॉटर प्रिजनर्स ऑफ आजकबन प्रकाशित झालं आणि 2000 मध्ये गाॅब्लेट आॅफ फायरने तर सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले. आणि या पुस्तकाच्या 372755 प्रति युकेमध्ये पहिल्याच दिवशी विकल्या गेल्या. 2001 मध्ये रोलिंगने “निल मूरे” नावाच्या डॉक्टरशी दुसरं लग्न केलं आणि 24 मार्च 2003 ला त्यांना डेव्हिड गाॅर्डन नावाचा मुलगा झाला. 21 नोव्हेंबर २००३ ला त्यांचं पाचवं पुस्तक आणि 2004 मध्ये पुस्तक लिहून अब्जाधीश होणाऱ्या रोलिंग पाहिल्या लेखक बनल्या. १६ जुलै 2005 ला त्यांचा सहावं आणि 19 जुलै 2018 मध्ये सातवं आणि अखेरचे पुस्तक प्रकाशित झालं आणि हे पुस्तक आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत सर्वात जास्त लोकप्रिय पुस्तकं बनलं.
नक्की वाचा:“गॅरेजमधून काम करून पुढे येत करोडोंची कंपनी उभी करणारे आबासाहेब गरवारे “