“या जगात आपलं नशीब आपण आपल्याच हाताने लिहायचं असतं ही काही चिठ्ठी नाही जी की दुसऱ्यांच्या हातून लिहिली जाईल”.
हि गोष्ट एका महिलेची आहे जिच्या नवऱ्याचा मृत्यू तरुणवयातच झाला होता तिच्या परिवारात दोन मुली होत्या त्यांना त्या महिलेने मोठ्या प्रेमाने सांभाळले होते.
मुली मोठ्या झाल्या तेव्हा त्यांची त्यांच्या मर्जीने लग्नं लावून दिली कुठं काहीच अडचण नव्हती. योगयोगाने त्या दोनही मुली आपापल्या घराची जबाबदारी सांभाळत होत्या त्यांचे पती काही जास्त कमावत नव्हते
दोनही मुली व्यवसाय करत होत्या एक मुलगी होती तिचा छत्र्या विकण्याचा व्यवसाय होता आणि दुसऱ्या मुलीचा शेवया बनवण्याचा व्यवसाय होता सगळं काही व्यवस्थित चालू होतं . ही जी त्या मुलींची आई होती ती त्या दोनही मुलींवर सारखंच प्रेम करत होती कधी या मुलीच्या घरी जात तर कधी त्या मुलीच्या घरी जात मुलीपण आईवर खूप प्रेम करत होत्या .
एक दिवस ही महिला रडायला लागली कारण त्या दिवशी कडक ऊन पडलं होतं.त्या महिलेला रडू येत होतं ती त्या मुलीला आठवून रडत होती जिचा छत्र्यांचा व्यवसाय होता जो की काही दिवसांपासून ठीक चालत नव्हता ही महिला ईश्वराला ओरडत होती की तू पाऊस का पडत नाहीस पाऊस पडला म्हणजे लोक छत्र्या खरेदी करतील आणि माझ्या मुलीचा व्यवसाय जोमानं चालेल, पाऊस पडत नाही त्यामुळे लोकं छत्र्या घेत नाहीत तिच्याकडे पैसे येत नाहीये पैसे नाही आले तर तिचं घर कसं चालेल
नक्की वाचा:“जीवनात इच्छित ध्येय्य साध्य करायचं असेल तर उत्साह ही तेवढाच गरजेचा आहे “