“जो माणूस दुसऱ्यांच्या आनंदात कायम आपला आनंद मानतो तो माणूस आयुष्यात कधीच दुःखी होऊ शकत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यात विघ्न कमीच येतात”
एकदा एका राजाने आपल्या राज्यात घोषणा केली की जो कोणी मला या जगातलं सर्वात शांत चित्र पाहिजे आहे ते जोपण चित्रकार ,कलाकार, पेंटर हे चित्र बनवून दाखवील त्याला पाहिजे तो इनाम दिला जाईल हिरे, दागिने, मोती जे पाहिजे ते दिलं जाईल ,परंतु चित्र हे जगातलं सगळ्यात शांत चित्र असलं पाहिजे ते एक शांतीचं प्रतीक असलं पाहिजे.
स्पर्धेची घोषणा झाली खूप सारे स्पर्धक पोहोचले होते भाग घेण्यासाठी तेथे आल्यावर प्रत्येकाने आपापल्या कला दाखवायला सुरुवात केली आणि चित्र काढायला सुरुवात केली त्यानंतर प्रत्येक फेरीनंतर बरेचसे स्पर्धक बाद होत गेले आणि शेवटच्या फेरीपर्यंत फक्त दोनच स्पर्धक शिल्लक राहिले त्यांच्या दोन पेंटिंग निवडल्या गेल्या. आणि त्या ज्या दोन पेंटिंग होत्या त्या दरबारात ठेवण्यात आल्या, सर्वांना पाहण्याकरता
नक्की वाचा: “जीवनातील समस्यांचं रडगाणं गायचं बंद करा”