(Photo credit:Google)
भारतात सार्वजनिक प्रवास करणे कायम थकल्यासारखं राहिलेलं आहे, त्याला कारण म्हणजे आपण ज्या वाहनांमध्ये प्रवास करतो त्या वाहनांमध्ये अवाजवी क्षमतेपेक्षा अधिक लोकांची भरती करणे, नीट जागेवर बसून प्रवासाचा आनंद न घेता येणे यामुळे प्रवाशांची स्थिती खराब बनते आणि अशातच जर कोणी खाजगी टॅक्सी बुक करायचं म्हटलं तर या टॅक्सी संघटनावाल्यांनी टॅक्सीचे दर इतके वाढवले आहेत की मध्यमवर्गीय माणूस आपले पाऊल मागे घेईल.
या त्रासाला कमी करण्यासाठी दोन तरुणांनी असा उद्योग उभा केला की तो संपूर्ण भारतातील लोकांचा प्रवास सुखकर करतो पण मित्रांनो आम्ही बोलत आहोत भारतातल्या सर्वात सफल उद्योगांपैकी एक ओला कॅब्सबद्दल जे की प्रवासी आणि टॅक्सीवाले यांच्यातील माध्यम आहे आणि आपल्या जबरदस्त तंत्रज्ञानामुळे हे संपूर्ण भारतात पोचले आहे.
ओला कॅब्सला बनवण्याची सुरुवात काही वर्षांपूर्वी झाली होती परंतु यांनी जी सफलता मिळवली ती खरच वाखाणण्याजोगी आहे आणि हा उद्योग सुरू करण्याचा श्रेय जाते भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी या उद्योजकांना.
भाविश अग्रवाल यांनी आयआयटी मुंबई मधून 2008 मधून पदवी पूर्ण केली आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया मध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली पुढचे दोन वर्ष ते याच कंपनीत काम करत राहिले
परंतु 2010 ला ओला कॅब्सची कल्पना त्यांच्या डोक्यात त्याच वेळी आली होती जेव्हा ते टॅक्सी करून बंगळूर ते बांदिपूर जात होते, परंतु निम्म्या रस्त्यात गेल्यावर अशी काही परिस्थिती उद्भवली की टॅक्स चालकांनी टॅक्सी तिथेच थांबवून भाविश यांना भाड्यापेक्षा अधिक रकमेची मागणी केली आणि जेव्हा भाविशने टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला तेव्हा टॅक्सी चालकाने त्यांना तिथेच सोडून पळ काढला यासोबतच टॅक्सीचा भाविश यांचा अनुभव खूपच खराब होता,
आणि मग त्यांनी विचार केला की हा प्रसंग आज माझ्यासोबत घडला आहे उद्या हा देशातील कोणत्याही व्यक्ती सोबत होऊ शकतो आणि खूप सारे लोक या खराब सेवेमुळे त्रस्त असतील आणि इथूनच लोकांचा त्रास कमी करण्यासाठी भाविशच्या मनात ओला कॅब्सची कल्पना आली.
म्हणतात ना तुम्ही जर लोकांच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा उद्योग नक्कीच वर जाऊ शकतो आणि ह्या उद्योगावर काम करण्यासाठी भाविशने आपला मित्र अंकित याला आपल्या सोबत काम करण्यासाठी तयार केले आणि दोघांनी सोबत मिळून जीव ओतून काम करण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळात इतर भारतीय आई-वडिलांसारखेच भाविशच आई-वडीलही त्यांच्या नोकरी सोडण्याच्या कामावर खुश नव्हते कारण त्यांना वाटत होतं की भाविशला अजून अनुभवाची गरज आहे म्हणून,
परंतु जेव्हा स्नॅपडील चे संस्थापक “कुणाल बहल” कडून ओला कॅब्सला फंडिंग मिळाली त्यानंतर त्यांच्या घरच्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला.भाविशचं म्हणणं होतं की चांगल्या नवनवीन कल्पना तर सगळ्यांच्याच जवळ असतात परंतु त्या कल्पना जेव्हा योग्य रीतीने उतरवल्या जात नाही तोपर्यंत तो व्यवसाय सफल बनत नाही,
नक्की वाचा:रस्त्यावर पेपर विकण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेन उभी करणारे “सॅम वाॅल्टन “
त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात शून्य मॉडेल पासून केली आणि या मॉडेलपासून त्यांनी स्वतःच्या मालकीच्या गाड्या लावण्याऐवजी थर्ड पार्टी मालकांकडून गाड्या घेण्यास सुरुवात केली आणि या मॉडेल नुसार ज्या व्यक्तीची स्वतःची आणि गाडीची कागदपत्रे परिवहन खात्याकडून वैध असतील असा कोणताही ड्रायव्हर त्यांच्यासोबत जोडला जाऊ शकत होता या सगळ्यांचं नियोजन केल्यानंतर ओलानी आपले पावरफुल मोबाईल अॅप लॉन्च केले ज्याद्वारे कोणीही प्रवासी आपल्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जिथे त्यांना जायचे तिथे ते टॅक्सी बुक करू शकतात .
ओला कॅब्स मध्ये तर पैसे लुटण्याचे काही कारण तर बनतचं नाही कारण की जे भाडं असतं ते प्रवासी आणि टॅक्सीचालक या दोघांच्याही मोबाईलवर दिसत असतं आणि याच तऱ्हेने भरपूर सुख सुविधांमुळे ओला आज आपल्या जीवनशैलीचा भाग बनली आहे आणि आज जर पाहिलं तर टॅक्सीच्या क्षेत्रात सुमारे 60 टक्क्यांपेक्षा जास्त अस्तित्व टिकवलं आहे त्यासोबतच खाद्य कंपनी फूडपांडाला ओलानी 2017 मध्ये विकत घेतलं. ओलाला आपल्यात येऊन जास्त वर्ष झालेले नाहीत असं वाटतं की अनेक वर्षांपासून ओला आपल्या जीवनाचा भाग आहे .
(Photo credit:Google)