“जीवनात प्रयत्न असे करा की हारता हारता तुम्ही कधी जिंकलात हे तुम्हालाच कळालं नाही पाहिजे”
त्यावरच आधारित एक गोष्ट आहे एका गरीब पेंटरची जो की खूपच जबरदस्त पेंटिंग बनवत होता खूपच चांगला कलाकार होता तो पेंटिंग मधले सर्व बारकावे सर्व खुबी त्याला माहीत होत्या परंतु काही केल्या त्याला जीवनात यश मिळत नव्हतं त्याची वाढ होत नव्हती त्याला समजत नव्हतं की मी एवढं चांगलं करतोय तरीही कमाल का होत नाहीये यश का मिळत नाहीये,
नक्की वाचा:“जीवनात वेगळं बनायचं असेल तर वेगळा विचार करावा लागेल “
त्याच शहरात एक अब्जाधीश राहत होता जो या पेंटरबद्दल वर्तमानपत्रांमध्ये नेहमी वाचत होता की हा मोठा कमालीची चित्रं बनवतो त्याच्या मनातही नेहमी येत असतं आपणही आपली पेंटिंग बनवावी बघावं तरी एकदा की किती कमालीचा कलाकार आहे हा जो गरीब पेंटर होता तो विचार करत होता की माझ्या आयुष्यात काहीच चमत्कार का होत नाही.
कुणीतरी एखादा धनाढ्य ग्राहक माझ्याकडे यावा ज्यामुळे माझं नशिबच पालटून जाईल आणि म्हणतात ना वरच्याची इच्छा असेल तर काहीही होतं आणि अखेर या दोघांची भेट झाली आणि तो धनाढ्य माणूस त्याच्याकडे पेंटिंग बनवून घेण्यासाठी आला आणि सांगितले की तुला इतकी सुंदर आणि जबरदस्त पेंटिंग बनवायची आहे जी की तू आतापर्यंत बनवली नसेल इतकी सुंदर की मी त्या पेंटिंगला जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये लावेल आणि त्या पेंटिंगला बघणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला पाहिजे एवढे सुंदर झाली पाहिजे त्या पेंटरने म्हटले की नक्कीच होऊन जाईल हा तर माझा छंद आहे लहानपणापासून मी हेच काम करत आलो आहे आणि पेंटर त्या ग्राहकाला सर्व काही सांगू लागला.
परंतु ग्राहक म्हणाला की मला काही सांगण्याची गरज नाहीये मला आधीपासूनच तुमच्याबद्दल सर्व काही माहित आहे आणि त्या पेंटरने आपलं काम सुरू केलं काही तासांतच मोठी कमालीची पेंटिंग बनून तयार झाली आणि तो जो अब्जाधीश माणूस होता तो ही पेंटिंग बघून मंत्रमुग्ध झाला आणि बघतच राहिला आणि म्हणून लागला वाह वाह खूपच म्हणजे खूपच सुंदर तुम्ही कमालच केली आता सांगा मी तुम्हाला काय बक्षीस देऊ ,
त्या गरीब पेंटरने विचार केला की काय सांगू 100 डॉलर मागू 200 डॉलर मागू नाही नाही 1000 डॉलर मागूयात परंतु एवढे मागितल्यावर ग्राहक म्हणेन कितीही मागत सुटलाय.त्यावर त्याने विचार केला की जाऊ द्या सोडून देऊ आणि म्हणू की तुमच्या इच्छेने जे द्यायचे ते द्या परत त्याच्या मनाने दुसरा प्रश्न केला की काय सांगता येते की यांनी काही दिलं नाही तर ;त्याला वाटलं की एवढ्या मुश्किलीने एवढा धनवान ग्राहक माझ्या हाती लागला आहे शेवटी त्याने हिम्मत करून म्हटले की सर तुम्हाला जे द्यायचे आहे ते द्या.
त्यावर त्या ग्राहकाने म्हटले की मी तुमच्या पेंटिंग वर एवढा खुश आहे की तुम्ही मला मंत्रमुग्ध केलं आहे त्यामुळे तुम्ही माझी पूर्ण बॅगच ठेवून घ्या पेंटरला वाटलं हे काय म्हणत आहे मी काय मागितले आणि हे काही देत आहेत मला याचा काहीच फायदा नाही मी नाही घेऊ शकत त्याच्या दुसऱ्या मनाने म्हटलं की हजार डॉलर मागायचे होते सगळे त्यातच आलं असतं ,मग त्याने म्हटले सर मी ही बॅग नाही देऊ शकत ही माझ्या कोणत्याच कामाची नाहीए तुम्ही मला एक हजार डॉलर द्या त्यापेक्षा जास्त मला काहीच नाही पाहिजे,
त्या ग्राहकाने आपली बॅग उघडली त्यात एक लाख डॉलर होते तो ग्राहक त्या पेंटिंगवर एवढा मोहित झाला होता की एक लाख डॉलर त्या पेंटरला देऊ पाहत होता परंतु त्याने फक्त 1000 डॉलरच मागितले.
ही कथा त्या पेंटर आणि त्या ग्राहकाची नाहीये तर ही तुमची आणि आपली कथा आहे आपण वरच्याला मागत असतो की माझ्या जीवनात चमत्कार कर हे कर ते कर मागता मागता थकत नाही कधी कधी तर आपण नवस करतो की तू हे केलं तर मी ते करीन आपण काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी घडवली आहे त्याच्याकडे मागायचं बंद करा आणि फक्त एवढेच मागा की तुझी कायम साथ हवी आहे कमाल होऊन जाईल वरच्याने आपल्याला जी बॅग दिली आहे ना ते आपलं जीवन आहे ते सर्वश्रेष्ठ गिफ्ट आहे ते मनुष्य जीवनाचे गिफ्ट सर्वांनाच मिळत नाही त्या बॅगेला आपण उघडून बघितलं पाहिजे आणि आपलं महत्त्व ओळखलं पाहिजे 100 डॉलर 200 डॉलर हजार डॉलरच्या मागे लालसेपोटी पळण्यापेक्षा.