SAM WALTON: Founder of Walmart(Photo credit:Google)
तुम्हाला जर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव विचारलं तर तुम्ही काय सांगाल “एलाॅन मस्क” तर होय “एलाॅन मस्क ” हीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे,
पण जर तुम्हाला विचारले तर जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं आहे तर काय सांगाल तर त्याचे उत्तर आहे वाॅल्टन कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत लोक जे की एलाॅन मस्क ,जेफ बेजोस,बिल गेट्स, वाॅरेन बफे जे की यांना आदर्श मानतात आणि त्यांच्याकडून शिकत शिकतच त्यांनी आपल्या व्यवसायात मोठी घेतली आहे.
तर या लेखात आपण यांच्या बद्दलची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत की कसा अमेरिकेच्या रस्त्यावर दूध आणि वृत्तपत्र विकणारा मुलगा 1982 ते 1992 पर्यंत जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता.
सॅम वाॅल्टन यांचा जन्म अमेरिकेच्या ओक्लाहोमा, येथे १९१८ ला झाला होता त्यांचे वडील एक शेतकरी होते त्याचबरोबर ते दूध आणि अंडी विकून घरखर्च चालवत होते काही वर्षानंतर जेव्हा दुसऱ्या मुलाचा जन्म झाला त्यानंतर घर खर्च वाढला त्यामुळे मिळकत कमी पडू लागली गावात शिक्षणाची चांगली व्यवस्था नसल्यामुळे सॅमच्या परिवाराने गाव सोडून शहरामधील स्थिर होण्याचा निर्णय घेतला
त्यांचे वडील शहरात छोटा मोठा कामधंदा करून चांगल्यापैकी कमाई करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत शिकवायला सुरुवात केली 1930 मध्ये सॅम जेव्हा बारा वर्षाचा झाला तेव्हा अमेरिकेत मोठी मंदी आली ज्याच्यामुळे पूर्ण अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळू लागली, घरची आर्थिक परिस्थिती बघता सॅमने हातभार म्हणून गल्लीत दूध व वृत्तपत्र विकण्यास सुरुवात केली परंतु त्या दरम्यान त्यांनी कधीही आपलं शिक्षण बंद केलं नाही
त्यानंतर त्यांचे कुटुंब कोलंबियांमध्ये कायमचे वास्तव्य करू लागले, आता सॅम आपला जास्तीत जास्त वेळ शाळेत देऊ लागला त्यासोबत शाळेतल्या इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ लागला शाळेनंतर दूध व वृत्तपत्र विकून झाल्या वरही हॉटेल समोर उभे असलेल्या गाड्या धुण्याचे काम करू लागला त्यानंतर सॅम सात ते नऊ या वेळात रेस्टॉरंट मध्ये ऑर्डर घेण्याचे काम करू लागला ही कामे करता करता त्यांनी अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली.
व तो J.C.PENNY नावाच्या कंपनीत शिकावू विक्रेता म्हणून काम करू लागला जिथं त्याला प्रत्येक महिन्याला 85 डॉलर मिळत असत 18 महिने काम केल्यानंतर तो 1942 ला दुसऱ्या महायुद्धादरम्यान सैन्यात भरती झाला 1946 दुसरं महायुद्ध संपेपर्यंत सॅमने सैन्यात आपली सेवा दिली त्यानंतर सेनेतून राजीनामा देत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार केला, त्यामुळे स्टोअर मध्ये काम करण्याचा पहिल्यापासूनच अनुभव होता त्यामुळे त्याला वस्तू विक्रीची जास्त आवड होती, त्याला डोक्यात घेत सॅमने आपले अनेक परिपूर्ण वस्तुंनी भरलेलं दुकान खोलण्याचं ठरवलं .
नक्की वाचा:“२०० अब्ज डॉलरचं स्वप्न पाहणारा मायकल डेल”
सैन्यात काम करत असताना सॅमने 5000 डॉलर जमा केले होते सॅम नवीन दुकान सुरू करणार इतक्यात त्यांची नजर एका दुकानावर गेली जे की खूप नुकसानीत चालू होतं आणि जेव्हा दुकानाच्या मालकासोबत सॅम बोलायला गेला तेव्हा त्याला समजलं की दुकानाचा मालक या दुकानाला पंचवीस हजार डॉलर मध्ये विकू पाहत होता त्यामुळे सॅमला दुकान खरेदी करायचं होते परंतु त्याच्याकडे पैशाची कमतरता होती. घ्यायचंच म्हणून त्याने पार्टनरशिपचा विचार केला व त्यासंबंधी आपल्या मित्रांना विचारायला लागला परंतु त्यांच्या मित्रांपैकी कोणीही त्यात रस दाखवला नाही त्यानंतर तो बँकेत कर्जासाठी केला परंतु बँकवाल्यानी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला
तरीही त्यांनी हार मानली नाही त्यानंतर सॅम काही गुंतवणूकदारांना भेटला परंतु त्यांनीही तोंड फिरवलं त्यासाठी जे दुकान पहिल्यापासूनच तोट्यात चालू होते ते त्यांच्या हाती पकडून निराशा झाली परंतु तरी पण सॅमचा आत्मविश्वास जराही डगमगला नाही कारण सॅमला विश्वास होता की एक दिवस तो या दुकानाला नक्की नफ्यात आणील आणि म्हणून तो प्रयत्न करत होता एक दिवस त्याच्या सासऱ्यांना त्याच्या या गोष्टीबद्दल माहिती झालं तेव्हा त्यांनी सॅमचा आत्मविश्वास बघता त्यांनी सॅमला तीस हजार डॉलरचं कर्ज देऊ केलं आणि जराही वेळ न लावता सॅमने ते दुकान खरेदी केलं .
काही महिन्यातच आपल्या विश्वास, कल्पना आणि अनुभवाच्या जोरावर तोट्यात चाललेल्या दुकानाला फायद्यात आणलं तेही जबरदस्तपणे आणि लवकरच त्यांनी आपलं 20000 डॉलरच कर्जही मिटून टाकलं त्यानंतर त्यांच्या आयुष्याने पलटीच खाल्ली.
त्यांनी आपल्या दुकानाचा फायदा वाढवण्यासाठी दुकानाबाहेर आईस्क्रीम विक्री चालू केली आणि ती स्वस्तात विकू लागले त्याच्यामुळे बरेच लोक आपल्या परिवारासोबत आईस्क्रीम खायला येत आणि त्यांची नजर सॅमच्या व्हरायटी स्टोअर वर पडायची आणि तिथे त्यांना भरपूर साऱ्या वस्तूंवर सूट दिसत ,सुटीचा लोभ ग्राहकांना दुकानात येण्यास भाग पाडत अशाप्रकारे त्यांचे आगळ्या वेगळ्या कल्पकतेने स्टोर ची विक्री आणि उत्पन्न वाढवण्यात मदत मिळाली.
कमी किमतीत जास्त वस्तू मिळत असल्यामुळे त्यांच दुकान संपूर्ण शहरात प्रसिद्ध बनले ते ग्राहकांच्या सेवेवरही जास्त लक्ष देत असत ज्याच्यामुळे दुकानाची विक्री तीन वर्षात तिप्पट झाली, परंतु म्हणतात ना चुकी सगळ्यांकडूनच होते आणि या चुकीतून माणूस काहीतरी शिकतो अशी चुकी त्यांच्याकडून झाली ती म्हणजे त्यांनी जेव्हा दुकान खरेदी केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या भाड्याकडे लक्ष दिले नव्हतं आणि त्याचा करार संपत आला होता दुकानाचा नफा बघत त्याच्या मूळ मालकाच्या तोंडाला पाणी आलं आणि त्याचं म्हणणं होतं की हे दुकान त्याच्या मुलाने संभाळावं त्यामुळे त्या मालकानी करार वाढवून देण्यास असंमती दर्शवली
त्यामुळे सॅमला आपला पूर्ण माल विकावा लागला जो त्याच्यासाठी मोठा धक्का होता परंतु येथेही तो खचला नाही आणि मलाच्या विक्रीतले 50 हजार डॉलर घेऊन तो पुन्हा नवीन जागा शोधू लागला व आपल्या स्पर्धकांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागला त्यानंतर या व्यक्तीने एका मोठ्या रिटेल स्टोअर आपण नवीन दुकान चालू केला आणि त्यात आपल्या काही कल्पना टाकत सात वर्षाच्या आत त्याने 16 नवीन दुकाने उघडली परंतु सॅम आता नवीन आणि मोठं करू इच्छित होता, त्याचं म्हणणं होतं की मोठ्या शहरात डिस्काउंट देऊन दुकानं खोलली गेली पाहिजेत डिस्काउंट मुळे ग्राहक आकर्षित होतात थोड्या वस्तूंवर डिस्काउंट देणे ऐवजी सर्वच वस्तूंवर डिस्काउंट दिला तर अधिक नफा कमवला जाऊ शकतो परंतु कंपनीच्या मालकाला ही कल्पना आवडली नाही आणि त्यांनी मग स्वतःचा दुकान खोलण्याचं ठरवलं.
सॅमने १९६२ मध्ये आपल्या भावासोबत पहिल्या मेगा स्टोअर ची सुरुवात केली आणि त्याला नाव दिलं गेलं “वॉलमार्ट” त्यानंतर कधीही त्याने मागे वळून पाहिले नाही त्यांनी एकापाठोपाठ दुकानांची संख्या वाढतच नेली जिथं ग्राहकांना कमी किमतीत एकाच छता खाली अनेक वस्तू मिळत असल्यामुळे ते त्यालाच पसंती देत. त्यामुळे ते खूपच प्रसिद्ध होत गेलं आणि लवकरच वॉलमार्ट हे रिटेल स्टोअर मधलं मोठं नाव बनलं आणि त्यांच्या शाखा संपूर्ण जगभर पसरल्या.
(Photo credit:Google)