”आखो मे मंजिले थी गिरे और संभलते रहे आंधियों मे क्या दम था, चिराग हवा मे भी जलते रहे
(Walt Disney photo Credit: Google)
आपण आज त्या व्यक्तीबद्दल त्या कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या कल्पनेच्या जोरावर जगभरातल्या बहुसंख्य मुलांच्या जीवनात आनंद पसरवला आहे तर खरंच आम्ही बोलत आहोत मिकी माऊस सारख्या अनेकविध व्यंगचित्रांचे जन्मदाता “वाॅल्ट डिज्नी” यांच्याविषयी ज्यांना कार्टूनच्या जगतात त्यांच्या योगदानामुळे 22 वेळा ऑस्कर पुरस्कार दिला गेला आहे जो की त्यांच्यातच एक विश्वरेकॉर्ड आहे.
त्यांच्याद्वारे बनवली गेलेल कंपनीचा समावेश मुख्यतः दहा मीडिया कंपन्यांमध्ये झालेला आहे आणि आज ही कंपनी अब्जावधी रुपयांचा व्यवसाय करत आहे परंतु मित्रांनो डिस्नीने ही स्थिती जशी प्राप्त केली तसं प्राप्त करणं आम्हाला नाही वाटत की ही दुसऱ्या कोणाच्या आवाक्यातली गोष्ट असेल म्हणून.
चला तर मग आपण जाणून घेऊया वाॅल्ट डिज्नी यांच्याबद्दल त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1901 ला अमेरिकेच्या हर्मसा इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव ELIAS DISNEY असं होतं जे की एक शेतकरी आणि सोबतच सुतार कामही करत होते;
परंतु पुढे जाऊन या सर्वांमुळे उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांनी बाजारात फळ विकण्याचंही काम केलं वेगवेगळी काम केल्यानंतर त्यांच्याकडे तेवढे पैसे उरत नसत ज्याने त्यांच्या कुटुंबाची योग्य प्रकारे काळजी घेतली जाऊ शकेल आणि ते आपल्या मुलांना शाळेत पाठवू शकेल त्यामुळे त्यांनी आपली शेती विकली आणि 1906 मध्ये छोटेसे गाव Marceline, Missouri येथे येऊन राहू लागले जिथे वाॅल्टच्या चुलत्याने आधीपासूनच जमीन घेतली होती. वाॅल्टच्या व्यतिरिक्त त्यांना तीन भाऊ तसेच एक छोटी बहिण होती,
(The Walt Disney Headquarter/Photo Credit: Google)
आणि चित्रकलेबद्दल सांगायचं तर त्यांना याची सुरुवातीपासूनच खूप आवड होती आणि चित्र काढायला त्यांना खूपच आवडायचं वाॅल्ट फरशी व भिंतीवर नेहमी काही ना काहीतरी काढत बसायचे एकदा तर त्यांनी आपल्या छोट्या बहिणीसोबत मिळून खडूने घराच्या भिंतीवर पेंटिंग काढली आणि त्यांची भिंत काळी करून टाकली त्याच्यामुळे वाॅल्टला आपल्या वडीलांचे बोलणे खावे लागले होते.
नक्की वाचा:“अमेरिकन अर्थव्यवस्थेला सलग तीन वेळा आर्थिक मंदीतून वाचवणारे जे.पी.मॉर्गन “
वाॅल्ट यांनी सात वर्षांच्या वयात आपल्या शेजाऱ्यांच्या घोड्यांचे चित्र काढले आणि ते त्यांच्या शेजाऱ्यांना इतके आवडले की त्यांनी या चित्राला पैसे देऊन खरेदी केले आणि अशा प्रकारे ही वॉल्ट डिज्नीच्या आयुष्यातली पहिली कमाई होती,
जर बोललं गेलं तर त्यांच्या सगळ्यात जवळच्याची तर त्यांच्या सगळ्यात जवळ त्यांचे भाऊ राॅय हे होते त्यांच्यासोबत ते त्यांचा पूर्णवेळ घालवत असत 1909 ला वाॅल्ट यांचा प्रवेश शेजारच्या एका शाळेत केला गेला परंतु त्यांचा परिवार पैशाच्या तंगीमुळे त्या गावात जास्त काळापर्यंत राहू शकला नाही आणि 1911 मध्ये आर्थिक तंगीमुळे ते Kansas नावाच्या शहरात राहण्यात गेले जिथे वडिलांना शेवटी एक मासिकं आणि वृत्तपत्र वाटण्याचं काम मिळालं आणि काही पैसे जमा झाल्याच्यानंतर त्यांनी वाॅल्टचं ऍडमिशन डेंटल ग्रामर शाळेत केलं परंतु वृत्तपत्र जास्त असल्या कारणामुळे वाॅल्ट आणि त्यांचे बंधू राॅयला आपल्या वडिलांची मदत करावी लागत असे. आणि त्यांना सकाळी साडेचार वाजता उठून कडाक्याच्या थंडीत पेपर वाटायला जावं लागत असे पेपर वाटल्यानंतर मग ते शाळेत जात असत आणि नंतर संध्याकाळी शाळेतून परत आल्यानंतर मासिकं वाटायला जात असत
वाॅल्ट आणि रॉय या सगळ्या कामांमुळे एवढे थकून जात असत की शाळेतल्या वर्गातच झोपत असत आणि त्यामुळे ते वर्गातील सर्वात कमजोर विद्यार्थ्यांमध्ये मोजले जात, परंतु एवढ्या समस्यांनी असलेल्या दिवसांतही वाॅल्टने चित्रकलेशी कधीही तडजोड केली नाही जेव्हा त्यांना थोडासा वेळ मिळत असे तेव्हा ते मासिकांच्या कव्हरला बघून नाहीतर आपल्या बुद्धीत विचार करून चित्र काढत असत.
वॉल्ट कायम आपल्या घराशेजारच्या सलून मध्ये जाऊन चित्र काढत असत आणि त्यांचे चित्र एवढे चांगले असत की सलूनचा मालक त्यांच्या चित्राच्या बदल्यात त्यांचे केस कापत असे आणि जेव्हा कधी केस कापण्याची गरज पडत नसेल तेव्हा ते त्याला पैसेही देत असत परंतु वाॅल्ट त्या चित्रांना पैशासाठी बनवत नव्हते तर एवढ्यासाठी बनवत होते की सलूनचा मालक चित्र आपल्या भिंतीवर पेंट करून लावत असे आणि खूप सारे लोकं त्या चित्रांना बघून त्यांना शाबासकी देत असत त्यामुळे वाॅल्टला आनंद मिळत असे आणि त्यांना प्रोत्साहन मिळत असे
मित्रांनो पॉपकॉर्न ,कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्या विकून आणि अशाच प्रकारची अनेक काम करत काही पैसा जमा करत वाॅल्टने डिझाईन क्लास घ्यायला सुरुवात केली. पुढेही काही वर्षांपर्यंत असा संघर्ष आणि शिक्षण चालू राहिले आणि मग 1918 मध्ये पहिल्या विश्व युध्दानंतर वाॅल्टने सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला परंतु वय कमी असल्यामुळे त्यांना नाकारलं गेलं आणि मग त्यांनी आपल्या जन्मतारखेला बदलून रेड क्रॉस मध्ये ॲम्बुलन्स चालवण्यासाठी ड्रायव्हरच्या पदासाठी अर्ज केला जिथे त्यांना सिलेक्ट केलं गेलं आणि त्यांची पोस्टिंग फ्रान्समध्ये केली गेली,
[ (Walt Disney Company Logo/Photo Credit: Google)
वाॅल्ट आतापर्यंत खूप सारे वेगवेगळे काम करत होते परंतु त्यांच्या डोक्यात कायमच त्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी प्रयत्न चालू होते ते आपल्या रुग्णवाहिकेला आपल्या कलाकारीने नेहमी सजवून ठेवत असत डिज्नीने ऑक्टोबर १९१९ मध्ये रेड क्रॉस ला सोडून दिलं,आणि परत अमेरिकेत आले जिथे त्यांना एका आर्ट स्टुडिओत आर्टिस्ट म्हणून नोकरी लागली होती
परंतु जानेवारी 1930 मध्ये त्यांना त्या नोकरीवरून यासाठी काढून टाकण्यात आले की त्यांच्या अंगात वेगळेपण नाही त्यांच्यात कल्पनाशक्तीची कमी आहे आणि ते कधीही एखाद्या सुंदर गोष्टीची निर्मिती करू शकत नाही परंतु ही गोष्ट डिज्नीच्या मनाला लागली होती कारण त्यांनी आपल्या पूर्ण जीवनात प्रत्येक गोष्टीची तडजोड केली होती परंतु आपल्या चित्रकलेशी कधीही तडजोड केली नाही आपल्या ह्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी एखादी छोटीशी कंपनी खोलली ज्याचे नाव होतं Laugh o Gramm स्टुडिओ परंतु पैशाच्या कमतरतेमुळे कंपनी लवकरच दिवाळखोर होवून बंद पडली.
नक्की वाचा:“जगातील सर्वात पहिले झालेले अब्जाधीश जॉन डी रॉकफेलर “
वाॅल्टजवळ पॉकेटमध्ये फक्त 20 डॉलर आणि कागदाच्या पेपरची सुटकेस शिल्लक होती यातील एकीकडे त्यांचे कपडे आणि दुसरीकडे चित्र काढण्यासाठी काही सामग्री ठेवली होती परंतु मित्रांनो त्यांनी आपल्या मेहनतीला कधीच सोडलं नाही आणि आपल्या भावाने रॉयने साचवलेल्या दोन हजार डॉलरच्या मदतीने कंपनी बनवली नंतर त्याचं नाव बदलून द वाॅल्ट ब्रदर कंपनी केलं .
आणि मित्रांनो म्हणतात ना “हार मानो नही तो कोशिश कम नही होती कोशिश करने वालों की कभी हार नही होती.”
डिज्नी भावांनी बनवली गेलेली कंपनी खूपच लवकर चालायला लागली आणि पुढे जाऊन त्यांनी खूप साऱ्या लोकांना कामावर ठेवले यांच जीवन बऱ्याच प्रमाणात रुळावर आलं होतं त्यांनी जुलै 1950 मध्ये LILIAN या नावाच्या एका मुलीसोबत लग्न केले ही त्यांच्या कंपनीत आर्टिस्ट म्हणून काम करत होती.
(Mickey Mouse /Photo Credit: Google)