(Photo credit:Google)
हा लेख त्या विशेष व्यक्तीमत्वाबद्दल आहे ज्यांनी फार कमी वयात यशाचं उंच शिखर सर करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी झटून मेहनत घेत शेवटी शिखरावर आपल्या नावाची विजयी पताका फडकावूनच दाखवली.
ज्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि १२व्या वर्षी २०००$ रक्कम त्यांच्याकडे साचली होती.आणि १४व्या वर्षी त्यांचं उत्पन्न म्हणजे शिक्षकापेक्षा अधिक होतं.ते म्हणजे संगणक क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकणारे “मायकल डेल“ होय.
त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५ ला अमेरिकेत ह्युस्टन शहरात झाला. त्यांचे वडील “अॅलेक्झांडर डेल” हे दंतवैद्यक होते तर आई “नील अल्फाज” या एक शेअर बाजार गुंतवणूकदार होत्या.
मायकल डेल यांनी आपलं शिक्षण हेराॅल्ड इलिमेंटरी स्कूलमधून केलं. गुंतवणूकीचे धडे त्यांनी आपल्या आईकडूनच घेतले. दहाव्या वर्षापासून त्यांना खर्चासाठी मिळणारी रक्कम वाचवण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा:भारतात मराठी माणसाची मान गर्वाने उंचावणारे उद्योजक “बाबा कल्याणी”.