(Photo credit:Google)
जर तुम्हाला समजात काही बदल घडावा असं वाटत असेल तर त्याची सुरुवात आधी स्वतःपासूनच करावी लागेल असं म्हणणं खूप वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या महात्मा गांधीजींचं होतं.
आणि या वाक्याला खरंच कोणी व्यक्तीने बदलले आहे तर ते आहेत “एलाॅन मस्क“. “एलाॅन मस्क” हे आफ्रिकी देशातले गुंतवणूकदार ,अभियंते आणि उद्योजक आहेत आणि आजच्या घडीला संपूर्ण जगात आपल्या दूरदृष्टीमुळे खूप प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे विचार नेहमी माणसाच्या समस्या सोडवण्यावर केंद्रित झालेली दिसून येतात आणि या विचारामुळेच ते संपूर्ण जगभरात एक हुशार उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत,
परंतु कोणताही व्यक्ती हा जन्मतः श्रीमंत नसतो त्याला त्याबाहेर निघून वरती पोहोचण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते त्यांनी लहानपणापासूनच खूप मेहनत घेतली आणि खूप सारा संघर्ष केला आणि मग नंतर लाखो तरूणांसाठी एक प्रेरणास्थान बनले. तर त्यांच्या या प्रेरणादायी जीवनाला आपण सुरुवातीपासून जाणून घेऊयात
आज पासून सुमारे 54 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरिया या शहरात 28 जून 1971 ला “एलाॅन मस्क” यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव “इरोल मस्क ” होतं आणि ते एक अभियंता असतानाच एक वैमानिकही होते आणि आईचं नाव “मये मस्क” ज्या एक मॉडेल आणि डायटीशन होत्या.
“एलाॅन मस्क” लहानपणापासून शिक्षणात जास्त रस घेत असत आणि कायमच पुस्तकांच्या अवतीभवती दिसत असत फक्त दहा वर्षांच्या वयात त्यांना संगणकाचा लगाव लागला आणि बारा वर्षाच्या वयात त्यांनी कम्प्युटर प्रोग्राम शिकत एक ब्लास्टर नावाचा गेम बनवला याला त्यांनी पीसी आणि ऑफिस टेक्नॉलॉजी कंपनीला 500 डॉलर ला विकून टाकलं.
आणि त्यानंतर त्यांची प्रतिभा ठळकपणे दिसू लागली होती ते आयझॅक आसिमोव्ह यांची पुस्तके वाचत असत आणि तेव्हापासून त्यांना तंत्रज्ञानाविषयी लगाव वाढू लागला लहानपणी त्यांना शाळेच्या दिवसात खूप त्रास दिला जात होता एकदा तर काही उनाड मुलांनी त्यांना पायऱ्यांवरून धक्का देऊन खाली पाडलं व इतकं मारलं की जोपर्यंत ते बेशुद्ध होत नाही त्यासाठी त्यांना खूप दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं होतं जर त्याला लहानपणी एवढ्या अडचणींचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी पुढे जाऊन मानवतेचा भल्यासाठी वाखाणण्याजोगे कार्य केले.
सतरा वर्षाच असताना “क्विन युनिव्हर्सिटीमधून” आपली पदवी पूर्ण केली आणि तिथे दोन वर्षे शिकल्यानंतर ते युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सलव्हेनिया येथे गेले जिथे त्यांनी 1992 ला भौतिकशास्त्राची पदवी घेतली. 1995 ते पी.एच.डी करण्यासाठी कॅलिफोर्निया येथे शिफ्ट झाले परंतु तिथं संशोधन सुरू करण्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी शिक्षण सोडलं एक यशस्वी व्यावसायिक होण्याच्या दृष्टीने आपली पावलं वळवली.
नक्की वाचा:भारतातील सार्वजनिक प्रवास सुखकर करणारे ”भाविश अगरवाल”
1995 मध्ये त्यांनी आपल्या भावाच्या मदतीने ZIP 2 नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. पुढे जाऊन कॉम्पॅक्टने ही कंपनी 307 मिलियन डॉलर रक्कम देऊन ही कंपनी खरेदी केली आणि ह्या विक्रीनंतर ZIP2 मधल्या आपल्या सात टक्के शेअर्सचे त्यांना एकूण 22 मिलियन डॉलर मिळाले आणि 1999 ला या पैशातल्या दहा मिलियन डॉलरची गुंतवणूक करत त्यांनी एक्स डॉट कॉम ची स्थापना केली जी की आर्थिक सेवा देणारी कंपनी होती
आणि एका वर्षानंतर ही कंपनी CONFINITY नावाच्या कंपनीसोबत जोडली गेली ही एक पैशांच हस्तांतरण करणारी कंपनी होती ज्याला आज आपण PayPal नावाने ओळखतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत PAYPAL हे पैसे पाठवण्याचे एक लोकप्रिय माध्यम राहिलं आहे.
PAYPAL 2002 मध्ये ebay ने अविश्वसनीय रक्कम देत खरेदी केलं आणि या सौद्यानंतर त्यांना पंधरा बिलियन डॉलर मिळाले होते. एलाॅन मस्क हे PAYPAL चे सगळ्यात मोठे भागधारक आहेत आणि 2002 मध्ये आपल्या पैशातल्या 100 मिलियन डॉलर खर्च करून त्यांनी स्पेस एक्स नावाची कंपनी स्थापन केली ,आणि ही कंपनी आकाश झेपावणारी वाहन बनवण्यासाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की 2030 पर्यंत सर्व माणसांना मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
2003 मध्ये त्यांनी दोन लोकांसोबत मिळून TESLA नावाची कंपनी सुरू केली 2000 नंतर टेसलाचे सीईओ म्हणून काम करू लागले आणि त्याचीच ओळख म्हणजे त्याची अप्रतिम इलेक्ट्रिक कार आहे 2006 मध्ये मस्क यांनी आपल्या चुलत भावाची कंपनी सोलरसिटी ला आर्थिक पाठबळ देत ती कंपनी सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आणि 2013 मध्ये सोलरसिटी ही सोलर पॉवर सिस्टम पुरवणारी दुसरी सगळ्यात मोठी कंपनी बनली आणि पुढे जाऊन 2016 मध्ये सोलरसिटीला आपल्यात सामावून घेतले. आणि आज घडीला सोलरसिटी पूर्णपणे टेस्लाच्या अंतर्गत कार्य करते.
(Photo credit:Google)