(Rowan Atkinson/Photo Credit:Google)
6 जानेवारी 1955 कॅसेट, इंग्लंड इथे “रोवन अटकिन्सन ” यांचा जन्म झाला त्यांचे वडील एरिक एटकिनसन एक शेतकरी होते आई गृहिणी होत्या रोवन तीन भावंडांमध्ये सगळ्यात छोटे होते लहानपणी ते खूपच लाजाळू होते असं असूनही त्यांना लोकांना हसवण्यात खूप मजा यायची.
ते चित्र विचित्र प्रकारचे तोंडाचे आकार बदलून लोकांना हसवण्याचे काम करत त्यांना लोकांच मनोरंजन करणे पसंत होते जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी एक चित्रपट पाहिला त्यामध्ये एकमुख विनोद दाखवला होता जो त्यांना खूप आवडला परंतु तोपर्यंत त्यांनी अभिनय किंवा विनोद करण्याविषयी विचार केला नव्हता ते चांगले विद्यार्थी होते आणि अभ्यास करून एक अभियंता त्यांना बनायचं होतं.
त्यांनी न्यू कॅसल विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली पुढे १९७५ ला या क्षेत्रातून एम एस सी करण्यासाठी त्यांनी क्विन्स कॉलेज ऑफ आॅक्सफर्ड मध्ये प्रवेश घेतला त्यादरम्यान त्यांना एका पात्रासाठी व्यासपीठावर अभिनय करण्यासाठी सांगितले गेले आतापर्यंत त्यांनी काही नाटकात सहभाग घेतला होता परंतु लिखाण त्यांच्यासाठी नवीन होतं ,परंतु हे लिखाण करतेवेळी त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ते ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याच्यात करिअर बनू शकते.
त्यावेळी काॅलेजमध्ये त्यांची ओळख रिचर्ड कार्टिनशी झाली ते एक लेखक होते आणि हार्वर्ड डाॅलशी जे एक संगीत दिग्दर्शक होते तिघे मिळून रेखाटन आणि नाटक बनवू लागले त्यांच्या कामाला दाद मिळू लागली त्यांचा एक कार्यक्रम पाहिल्यानंतर जॉन लॉर्ड जे एक बीबीसी निर्माता होते त्यांनी रोवनला एका टीव्ही शोमध्ये काम करण्यासाठी प्रस्ताव दिला.
आता बावीस वर्षांच्या रोवनजवळ दोन मार्ग होते एक जे त्यांचे मित्र होते त्यांच्यासोबत मिळून चांगले पैसे मिळत होते आणि दुसरीकडे एक टीव्ही शो होता जो करणं त्यांच्यासाठी नवीन होतं आणि हेही त्यांना माहीत होतं की टीव्हीमध्ये ते जर प्रसिद्ध झाले तर ते खूप जास्त पुढे जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी टीव्ही शोला निवडलं आणि त्यांचा पहिला शो होता Not the 9 o’clock news हा शो सफल राहिला आणि त्यानंतर त्यांच्या अॅक्टींग आणि लिखाणाचं कौतुक झालं .
त्यानंतर त्यांना ब्लॅक डॅडर शो मिळाला ज्याचे ते उपलेखक होते त्यांचे जिवलग मित्र रिचर्ड कार्टिस त्यांच्यासोबत त्यांनी कॉलेजच्या दिवसात काम केले होते ब्लॅक अॅडर ही मालिका ब्रिटनच्या मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक सफल मालिका राहिली आहे रोवन प्रत्येक ठिकाणी दिसू लागले आणि लोकप्रिय बनू लागले.
(ROWN ATKINSON AS A MR. BEAN/PHOTO CREDIT:GOOGLE)