(PANASONIC COMAPNY IMAGE /pHOTO CREDIT:GOOGLE)
मित्रांनो एक काळ असा होता की पॅनासोनिक हा जगातला सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक ब्रँड होता. ज्याचा हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक शेवर, बॅटरी व टीव्ही सारखी कोणती न कोणती वस्तू नक्कीच तुमच्या घरात वापरली असेल विसाव्या शतकाच्या दरम्यान या कंपनीला जपानचा गौरव समजले जायचे ,जे की प्रत्येक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेमुळे नावारूपाला येत होता.
परंतु 21वं शतक PANASONIC साठी खूप सारी आव्हानं घेऊन आलं. फक्त या कंपनीला मोठा तोटा झाला नाही तर या कंपनीला आपल्या संवादाच्या वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांसोबतच टीव्ही व्यवसायालाही बंद करावं लागलं परिस्थिती एवढी खराब बनली की त्याला आपली सर्व मालमत्ता विकावी लागली सोबतच कंपनीने टेसलामधले 3.2 अब्ज डॉलरचे शेअर्सही विकले या कंपनीने मागच्या 30 वर्षातील दीड लाखपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले,
या सर्वांपेक्षाही काळजीची गोष्ट ही आहे की तुम्ही पॅनासोनिक ची दिवाळखोरी तपासली तर तुम्हाला ती 100% आढळून येईल म्हणजेच कंपनी दिवाळखोरीच्या सर्वोच्च टोकावर आहे परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की एवढ्या चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या कंपनीसोबत असं काही घडलं की आज कंपनीची ही अवस्था आहे.काय कारण आहे की एकेकाळी जगात सर्वात वरच्या स्थानी असलेली कंपनी आज बरबादीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
नक्की वाचा:आधुनिक कारचा जनक “हेन्री फोर्ड”
(Konosuke Matsushita: Founder of Panasonic electronics/PHOTO CREDIT; YOU TUBE)
चला तर याबद्दल बारकाईने जाणून घेऊयात तर PANASONIC या कंपनीची सुरुवात होते 27 नोव्हेंबर 1894 ला जेव्हा जपानच्या WAKAYAMA PREFECTURE मध्ये KONOSUCKE MOTSUSHITA यांचा जन्म झाला हे पाच बहिणी आणि तीन भावंडांमध्ये सगळ्यात छोटे होते त्यांच्या आयुष्याचे पहिले काही वर्ष खूपच संपन्न आणि खुशाल राहिली परंतु जेव्हा MOTSUSHITA चार वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांना आपल्या व्यवसायात झालेल्या मोठ्या तोटे मुळे त्यांच्याकडची सर्व मालमत्ता विकावी लागली हेच काय की त्यांना त्यासाठी आपल्या गावाकडच्या घरालाही सोडावं लागलं होतं त्याच्या तीन वर्षानंतर कामाच्या शोधात संपूर्ण परिवार शहरात आला तिथे आल्यावरही त्यांच्या परिस्थितीत काही खास सुधारणा झाली नाही त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक खराब झाली,
की जेव्हा KONOSUCKE नऊ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी त्यांचे शिक्षण सोडून एका दुकानात काम करायला सुरुवात केली परंतु त्याच्या आधी त्यांच्या जीवनात काही फरक जाणवणार इतक्यात उद्भवलेल्या मंदीमुळे ते काम करत असलेल्या दुकानाच्या मालकाने त्यांना कामावरून काढून टाकले त्यानंतर ते कामाच्या शोधात इतरत्र भटकू लागले त्यांना एका सायकलच्या दुकानात नोकरी मिळाली या नोकरीने त्यांना खूप काही शिकवलं होतं परंतु ते स्वतःला कायमसाठी या कामाला करू इच्छित नव्हते त्यामुळे ते या ठिकाणी काम करत असतानाही इतर ठिकाणी काम शोधायला सुरुवात केली होती.
त्यांच्या जीवनात सर्वात मोठे वळण तेव्हा आले जेव्हा पाच वर्षापर्यंत सायकल शॉपवर काम केल्यानंतर अचानक त्यांना एक OSNKA इलेक्ट्रिक कंपनीची जाहिरात दिसली आणि त्यांनी पटकन त्यासाठी आवेदन दिले आणि सुदैवाने त्यांना ते काम मिळाले .या कंपनीत KONOSUCKE ना इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात खूपच रस होता त्यामुळे जेव्हा ते मोकळे असायचे तेव्हा ते त्यासंबंधीची पुस्तक वाचायला सुरुवात करायचे आणि तिथून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावरती प्रयोगही करायला सुरुवात करायचे KONOSUCKE हे खूपच मेहनती होते ते नेहमीच कामाचे बारकावे शिकण्याचा प्रयत्न करायचे त्यांचा कामाप्रती लगाव आणि मेहनत बघता पाच वर्षांतच त्यांना कंपनीतील टेक्निकल इन्स्पेक्टर या पदावर भरती देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय वीस वर्षे होतं त्यांच्या या कमी वयात मोठं पद घेण्याच्या गोष्टीने सर्वांनाच आश्चर्यात टाकलं होतं .
त्यांच्या कामाप्रती लगाव आणि मेहनतीने त्यांना गरिबीतून तर बाहेर काढलेच होते. परंतु त्यांचे स्वप्न हे त्यापेक्षाही कितीतरी पटींनी अधिक होतं त्यामुळे ते नेहमी काही ना काही प्रयोग करत असेत त्यातूनच त्यांनी एक इम्प्रोपर इलेक्ट्रिकल सॉकेट बनवला आणि उत्सुकतापूर्वक ते त्या SOCKETला आपल्या सुपरवायझरला दाखवायला गेले परंतु त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटलं की त्यांच्या सुपरवायझरने ते सॉकेट मार्केटमध्ये चालणार नाही असे सांगत तर रिजेक्ट केले. परंतु KONOSUCKE ला
आपल्या प्रॉडक्ट वर खूपच विश्वास करत होते त्यामुळे त्यांनी खूपच मोठा निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या कामाला सोडण्याचा.
कामाला सोडल्यानंतर त्यांनी आपल्या साचलेल्या बचतीतून काही टूल्स खरेदी केले आणि एक टीम तयार केली त्यांनी आपला भाऊ, बायको आणि काही कामगारांना सामील करून घेतले या सगळ्यांच्या सोबत मिळून KONOSUCKE घरातच सॉकेट बनवू लागलेआणि आपल्या दोन खोल्या असलेल्या घरात शॉप उघडून विकण्याचा प्रयत्न करू लागले तसे त्यांनी ते सॉकेट बाजारात जाऊन विकण्याचाही प्रयत्न केला परंतु त्याचा काही खास फायदा होत असल्याचा दिसत नव्हता हळूहळू परिस्थिती एवढी खराब झाली की त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर काम करणे बंद केलं आणि आता त्यांच्या टीममध्ये फक्त तीनच लोक उरले होते त्यांची बायको आणि त्यांचा मोठा भाऊ त्यावेळी त्यांची परिस्थिती एवढी खराब बनली होती की त्यांना त्यांच्या घरातलं सामान विकावं लागलं.
त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत विचार यायचा की हे सर्व सोडून आपली आधीची नोकरी परत एकदा जॉईन करावी परंतु त्यांचा विश्वास इतका मजबूत होता की त्यांच्या प्रत्येक नकारानंतर एक नवीन प्रयत्न करण्यासाठी तयार करत होता त्यादरम्यान त्यांनी खूप सारे प्रयोग केले आणि खूप नवीन प्रॉडक्ट बनवले त्यामुळे एक प्रॉडक्ट असे होते त्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं
काही महिन्याच्या मेहनतीनंतर त्यांनी एक सोल्युशन प्लेट बनवली होती ज्याची बाजारात खूपच मागणी होती या प्रोडक्टमुळे त्यांच्याकडे इतके पैसे आले की त्यांचा आयुष्य पुन्हा एकदा रुळावर यायला लागलं. त्यांनी ७ मार्च 1918 ला आपली स्वतःची कंपनी Matsushita Electric ची सुरुवात केली जी नंतर चालून Panasonic बनली त्यांची इन्सुलेशन प्लेट मार्केटमध्ये व्यवस्थित रित्या चालू होती तरीही KONOSUCKE यांचं डोकं इलेक्ट्रिक सॉकेट मध्येच लागून राहिलं होतं परंतु यावेळी त्यांनी लोकांची गरज ओळखली आणि त्यानुसार त्यात बदल केले त्यावेळी त्यांना खूपच यशस्वी प्रोडक्ट मिळाले अटॅचमेंट प्लग आणि टू वे सॉकेट हे दोन प्रॉडक्ट त्यांच्या ओरिजनल लाईट प्रॉडक्ट पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले आता KONOSUCKE जवळ तीन यशस्वी प्रोडक्ट्स होते ज्यामुळे त्यांना इतका नफा झाला की त्यांनी लवकरच 20 कर्मचाऱ्यांसोबत आपल्या व्यवसायाला दोन मजली इमारतीत बदललं.
नक्की वाचा:काळानुसार बदल स्विकारला नाही म्हणून एकेकाळी कॅमेरा जगतावर अधिराज्य गाजवणारी “KODAK” कंपनी नामशेष झाली
(PANASONIC COMPANY ALL PRODUCTS/PHOTO CREDIT :GOOGLE)