मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की आजपासून सुमारे सात वर्षांपूर्वी भारताच्या टेलिफोन सेक्टरमध्ये एअरटेलने एकाधिकारशाही प्रस्थापित केली होती परंतु जिओ या कंपनीच्या येण्याने पूर्ण टेलिफोन सेक्टरचाच मूड बदलला आहे
तरी मोठ- मोठ्या कंपन्या जशा की डोकोमो, टेलीनॉर, आणि एअरसेलला तर टाळाच लागला. एवढेच काय तर एअरटेलला आपल्या रिचार्जच्या किमतीमध्ये सुमारे दहापटीने कपात करावी लागली (Airtel Company Logo /Photo Credit:Google)
आणि मित्रांनो आजच्या वेळेला भारतीय टेलिफोन सेक्टरमध्ये असं काही चालू आहे जिथे एअरटेल “जिवो”लाच मागे टाकताना दिसत आहे,
तेव्हाच तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये जिओने 1.2 ट्रिलियन डॉलर चे उत्पन्न मिळवले होते तिथे एअरटेलचे उत्पन्न 1.39 ट्रिलियन डॉलर इतके होते त्यामुळे जिवोचा खेळ पूर्णपणे उलटा पडला आणि आपल्या याच युक्तीच्या जोरावर एअरटेल जिओ ला हरवण्यात सफल दिसून येत आहे. चला तर या सर्वांविषयी आपण विस्ताराने जाणून घेऊ तर
जिवोच्या येण्यापूर्वी भारतीय टेलिकाॅम मार्केटमध्ये कितीतरी कंपन्या होत्या एअरटेल ,एअरसेल,टेलीनॉर ज्यांच्या टॅक्समुळे मध्यमवर्गाच्या खालच्या लोकांना आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर करणं परवडत नव्हतं कारण त्यांना फक्त कॉलिंग करणे महाग पडत होते
परंतु जिवो हे मार्केटमध्ये येताच मोफत सुविधा देण्यास सुरुवात केली त्यामुळे काही मोठमोठ्या एमटीएस, व्हिडिओकॉन मोबाईल यांसारख्या कंपन्या बंद पडल्या वोडाफोन आणि आयडिया यांच तर विलीनीकरण होऊन त्यांचे VI बनलं.
बीएसएनएल ला कसंतरी करून सरकारने जिवंत ठेवलं होतं परंतु तेव्हापासून आतापर्यंत जिवोला ज्या कंपनीने टक्कर दिली असेल तर ती एकमेव कंपनी आहे एअरटेल.
नक्की वाचा:एक गरीब मेकॅनिक ज्याने कार कंपनी तयार केली “सोईचिरो होंडा “
एअरटेलने जिओ समोर स्वतःला फक्त टिकवणूनच ठेवलं नाही तर अशी युक्ती शोधून काढली की ज्याने उत्पन्नाच्या बाबतीत जिवोलाही मागे सोडले आणि परत आपली पूर्वस्थिती हस्तगत केली जी आजपासून सुमारे सात वर्षांपूर्वी होती
परंतु एअरटेलने हे कसे केले जाणून घेण्यासाठी आपल्याला या दोन्ही कंपन्यांच्या लक्ष्यस्थानी असलेल्या ग्राहकांच्या संख्येबद्दल जाणून घेऊयात
सर्वात आधी जिवो त्या ग्राहकांवर लक्ष देतो जे मध्यमवर्गीय आणि त्यापेक्षा खालच्या वर्गात येतात उदाहरणासाठी एक फोन त्याची किंमत फक्त 999 रुपये आहे ज्याच्या मदतीने जिवो त्या लोकांना इंटरनेटवर आणण्याचा प्रयत्न करतो जे आतापर्यंत फक्त 2Gचाच वापर करत होते
आणि मध्यमवर्गीय लोकांच्या वरच्या लोकांकडे बघितले गेले तर त्याच्यासाठी जिवोने आपला जिओ फोन नेक्स्ट लॉन्च केला जिओ पोस्टपेड, जिओ फायबर, आणि जिओ सिनेमा ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते परंतु त्याचा ओघ मध्यम वर्ग आणि त्यापेक्षा खालच्या ग्राहकांकडे जास्त होता.
(Jio company Logo /Photo Credit:Google)
आणि तिथेच आपण एअरटेल ची गोष्ट करू तर ते त्यांच्या मागे न जाता आपली स्वतःची युक्ती लॉन्च करतात यामुळे त्यांना दीर्घ काळापर्यंत फायदा होतो एअरटेल ग्राहकांना जलद आणि दर्जेदार सेवा पुरवतो तिथेच जिओचा ओघ हा जास्तीत जास्त ग्राहकांना स्वतःकडे जोडणे आहे हेच कारण आहे की जिवो सर्व प्रकारच्या ग्राहक गटाला आपली सेवा देत असत,
एअरटेल फक्त प्रीमियम गटातल्या ग्राहकांना म्हणजेच त्यांचं बजेट किंवा खरेदी क्षमता जास्त आहे अशांना आकर्षित करतो
2018 मध्ये देण्यात युनिव्हर्सल क्लिनअपच्या माध्यमातून 49कोटी निष्क्रिय ग्राहकांना एअरटेल ने कमी केलं होतं जे की नियमित रिचार्ज करत नव्हते या त्यांच्या पावलामागे उद्देश एवढाच की दर्जा उंचावणे तसेच सक्रिय ग्राहकांना जास्तीत जास्त किंमत मिळवून देणे ही कंपनीसाठी मोठी गोष्ट होती कारण लाखोंच्या संख्येत असणाऱ्या ग्राहकांना कमी करणे ही मोठी हिम्मतिची बाब होती.
परंतु दीर्घकाळासाठी याचा जास्त फायदा बघायला मिळाला लोकांना चांगल्या सेवा मिळायला लागल्या आणि कॉलिंग आणि इंटरनेटमध्ये त्रुटी कमी असल्याच्या या कारणांनी ग्राहकांचा अनुभव खूपच जास्त चांगला होऊ लागला
जसे की जिओचा हा हेतू फक्त ग्राहकांची संख्या वाढवणे असल्यामुळे त्याचा परिणाम काही दिवसानंतर त्यांच्या नेटवर परत पाहायला मिळू लागला आणि जिओची सेवा संथ असल्या कारणाने लोक एरटेलकडे वळू लागली.
ट्रायच्या अहवालानुसार ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2019 च्या दरम्यान जिवोने 10 दशलक्ष ग्राहक जोडले होते तिथे एअरटेलने 25दशलक्ष नवीन ग्राहक जोडले होते जे की जिओच्या तुलनेत तीन पट जास्त होते अशात सबस्क्राईबला मोठा फायदा पुढच्या दोन वर्षातच पाहायला मिळाला. एअरटेल योग्य भविष्याच्या प्लॅनसोबत पुढे जातो हीच गोष्ट आपल्याला आपल्या जीवनातल्या गोष्टी हस्तगत करण्यास वापरल्या गेल्या पाहिजे.
(All old indian Telenor Companies /Photo credit:Google)
आता तुम्हाला तो काळ आठवत असेल जिथे फक्त एक जीबी डेटा साठी ग्राहकांना 250रुपये पासून, 350 रुपये पर्यंत द्यावे लागायचे परंतु सुरुवातीला JIO अमर्यादित मोफत डाटा नंतर रिचार्ज प्लानची ऑफर देऊन त्यांनी सर्व टेलिकाॅम कंपन्याना आपल्या प्लॅनची किंमत कमी करण्यास भाग पाडले तोपर्यंत एअरटेल ही सगळ्यात महाग रिचार्ज प्लॅन विकत होता त्याला पण आपले रिचार्ज दहा पटीत कमी करण्यास भाग पाडलं होतं
आत्ताच्या परिस्थितीबद्दल बोलायचं म्हटलं तर मार्केटमध्ये एवढी जबरदस्त स्पर्धा असताना जानेवारी 2023 च्या अहवालानुसार एअरटेल ने आपले रिचार्ज 57% पर्यंत वाढवले होते जिथे त्यांचा सुरूवातीचा रिचार्ज 99 रुपये होता तिथे तो 155 रुपये केला होता म्हणजेच तुम्हाला एअरटेलचं सिम चालू ठेवण्यासाठी कमीत कमी 155 रुपये चा रिचार्ज करावा लागतो नाहीतर मोबाईल मध्ये एसएमएस आणि कॉलिंगच बंद होऊन जातात
(Airtel xtreme Fibre /Photo credit:Google)
तिथेच मात्र जिओच्या बाबतीत असं काहीच बघायला मिळत नाही तुम्ही जिवो मध्ये रिचार्ज करा किंवा नाही तरीही कमीत कमी 90 दिवसांपर्यंत तरी एसएमएस आणि कॉल चालूच राहतात.
साल होतं 2022 जेव्हा जिवोला मार्केटमध्ये येऊन पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला होता आणि यांनी भारताच्या जवळपास प्रत्येक घरात प्रवेश केला होता अशातच कोविड काळातील एक नवीन संधी दिसायला लागली त्यांना तिथेही प्रवेश करायला संधी मिळाली जिथे जिथे प्रवेश केला होता आणि लोकांची पहिली पसंत हा जिवो बनला होता ,
खरंतर जेव्हा कोरोना लाॅकडाऊन मुळे लोकं आपापल्या घरात कैद झाले तिथे ऑफिसच्या कामापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत सर्व काही ऑनलाइन होत होते मग काय याच गोष्टीचा फायदा घेत एअरटेलने प्रत्येक मोठ्या शहरात आपला प्लान लॉन्च केला त्या काळात लोकांना जास्त वेगाने चालणाऱ्या इंटरनेटची आवश्यकता होती त्यामुळे त्यांनी लगेचच याचा स्वीकार केला;
आणि बघता बघता 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचे जास्त ग्राहक बनले आजच्या घडीला गरजेप्रमाणे फक्त इंटरनेटचा डेटा देत नाहीत तर त्याच्या सोबत अजूनही इतर सवलती एअरटेल आपले उत्पन्न तसेच ग्राहक वाढवत आहेत जसे की याच्यासोबत दिल्या जाणाऱ्या फॅमिली पोस्टपेड सिम कार्ड मध्ये बदलून पैशांची बचत करू शकतात आता यातून लोकांना किंमत तर मिळतच आहे आणि कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे,
आता सगळ्यात जास्त नुकसान कोणाला होत आहे तर ते म्हणजे जिवोला ज्या घरात जिवोचं सीम वापरलं जात होतं तिथे जाऊन ब्रॉडबड इंटरनेटच्या माध्यमातून एअरटेल तिथल्या ग्राहकांना चांगल्या सेवेची लालूच देऊ इच्छित होतं आणि त्यामुळे जिवोचे ग्राहक वेगाने एअरटेल मध्ये बदलले जात होते मार्केटमध्ये जिवो फायबरचा ही पर्याय उपलब्ध आहे ज्याला की सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च केले होते,
आणि आताही जरी बघितलं तर आज जास्त लोकांना एअरटेलचं फायबर वापरायला आवडतं आणि त्याचं कारण म्हणजे चांगली सेवा आणि तसेच चांगली इकोसिस्टीम बनवण्यास लागला आहे.
कारण जेव्हा कोणी एखादा ग्राहक कंपनीच्या कोणत्याही एका सेवेला वापरायला लागतो तेव्हा त्याची जास्त शक्यता आहे की त्यांच्या इकोसिस्टीम मुळे बाकीचेही प्रॉडक्ट वापरले जावे म्हणून, उदाहरण म्हणून जसं की तुम्ही एअरटेल सिम वापरत असाल तर एअरटेल ने दिलेली पेमेंटची एअरटेल थँक्स वापरत असाल किंवा मनोरंजनासाठी एअरटेल एक्स्ट्रीम चा वापर नक्कीच करत असावेत कारण की तुम्हाला तिथं 17 OTT चा पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होतो.
तर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला मोफत सेवा पुरवण्यासाठी कंपनीचा काय फायदा असेल तर त्याचे उत्तर आहे जाहिरात कंपनीचा सर्वात जास्त फायदा जाहिरात दाखवण्यात असतो परंतु फक्त जाहिरात दाखवून किंवा इकोसिस्टीम तयार करून जिओच्या पुढे जाणं शक्य नाही आणि जिओचा ग्राहकांचा नंबर एअरटेल पेक्षा खूप मोठा आहे ,
नेमकं मग असं काय आहे ज्यामुळे जिवो एअरटेलचा सामना कधीच करू शकत नाही तर ते आहे ARPU. AVERAGE REVENUE PER USER म्हणजेच प्रत्येक ग्राहकांमध्ये कमावले गेलेले सरासरी उत्पन्न हे एअरटेलचे अधिक आहे जिथे जिओ चा ARPU 167 रुपये आहे तिथे एअरटेलचा 178 रुपये आहे जिओच्या जवळ एअरटेल पेक्षा जास्त ग्राहक असल्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत जास्त फरक पडत नसावा.
जिवोने या आपल्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत शंभर दशलक्षेपेक्षा जास्त ग्राहक जोडले होते या इंडस्ट्रीत एवढी वाढ आतापर्यंत कोणत्याच कंपनीने पाहिली नव्हती परंतु जिओच्या बाबतीत असे झाले होते फक्त आणि फक्त त्यांनी दिलेल्या मोफत सेवेमुळे जिवोने मिळवलेले जास्त ग्राहक हे त्यांनी दिलेल्या मोफत सुविधामुळे तसेच स्वस्त प्लान मुळे आहेत;
(JIO VS AIRTEL TELECOM WAR/Photo Credit:Google)