Col. Harland Sanders, founder of KFC/(Photo credit:Google)
मुश्किल इस दुनिया मे कुछ भी नही फिर भी लोग अपने इरादे तोड देते है | अगर सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की तो सितारे भी अपनी जगह छोड देते है|
हि प्रेरणादायी कहाणी त्यांची ज्यांनी आयुष्यभर कायम संघर्षच केला . हार न मानता संघर्षाविरुध्दचा आपला प्रवास कायम सुरुच ठेवला,आणि आपल्या शेवटच्या दिवसात यशस्वीतेचा आदर्श कायम केला त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून कोणीही आपलं बोट आश्चर्याने सहज दाताखाली दाबेल.
ते आहेत के.एफ.सी. या जगातील सर्वात यशस्वी रेस्टॉरंटच्या संस्थापकाची ज्यांच नाव आहे “कर्नल हर्नाल्ड सॅन्डर्स ” ज्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी आपल्या वडिलांना गमावले, परिस्थितीमुळे त्यांच्या खांद्यावर वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांच्या लहानग्या भावा-बहिणीची जबाबदारी आली. नोकरीसाठी त्यांनी सुरुवात केली परंतु त्यांना तेथेही ठोकरा खाव्या लागल्या. लग्नानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिले,एक व्यवसाय त्यांनी सुरू केला पण तोही लवकरच बंद करावा लागला. ६५ वर्षांपर्यंत त्यांनी काहीही न करता फक्त स्वतःच पोट भरण्याच काम केलं परंतू त्यानंतर त्यांनी स्वत:च्या चुकांमधून शिकत शिकत अशा कंपनीची सुरुवात केली की जिच्या जगभरात ११८ पेक्षा जास्त देशांमध्ये शाखा आहेत आणि ह्या कंपनीची वार्षिक उलाढाल खूप जास्त आहे .
Must Read: ZERODHA” या कंपनीला नं. १ ची ब्रोकिंग फर्म बनवणारे “निखिल कामथ”