आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची जोड जर आपल्या आयुष्यात मिळाली तर यश मिळवणं सहाजिकच सोपं होतंच पण त्याबरोबर आपण त्या क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती नक्कीच बनू शकतो.
(Michael Jordan/Photo Credit: Google)
परंतु आज तुम्हाला अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल परिचित करणार आहोत की जी फक्त प्रभावीच नाही तर त्या क्षेत्रातील साक्षात देव म्हणून गणली जाऊ लागली. ती महान व्यक्ति आहे मायकल जॉर्डन. ज्यांना बास्केटबाॅल या खेळाचा देव म्हणतात. मायकल जॉर्डन यांचा इ.स.वी सन 17 फेब्रुवारी 1963 रोजी ब्रुकलिन या अमेरिकास्थित न्युयाॅर्क मध्ये अतिशय गरीब कुटुंबात झाला.
त्यांना ४ भावंड होती आणि त्या सर्वांना सांभाळण त्याच्या आई बापाला अशक्य होतं . खरं पहायला गेलं तर अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाल्यावर खचून न जाता त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीबी तर दूर लोटलीच पण आताच्या घडीला बास्केटबॉल खेळातले सर्वाधिक श्रीमंत खेळाडू म्हणून गणले जातात.सांगायचं झालं तर त्यांची एकूण संपत्ती जवळपास 2.1 अब्ज डॉलर एवढी आहे.
नक्की वाचा:“आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत इतर दिव्यांगांना सन्मानाने जगायला शिकवणारे श्रीकांत बोला “
इथपर्यंत मजल मारायची सुरुवात जाॅर्डन यांनी लहानपणापासूनच केली होती.आणि त्यांच्या या कार्यात त्यांच्या वडिलांनी खूप मोठी प्रेरणा म्हणा किंवा संस्कार करायला त्यांच्यावर लहान वयातच सुरुवात केली होती. आपल्यातली सकारात्मकता व आत्मविश्वास वाढविल्यानंतर कितीही असाध्य गोष्ट साध्य केली जाऊ शकते हे सांगण्यासाठी त्यांची परीक्षाच घेतली.
(Michael Jordan God Of Basketball/Photo Credit:Google)
त्यासाठी मायकलकडे असलेला एक डाॅलरचा शर्ट त्यांनी घेतला आणि तो त्याला 2 डाॅलरला विकून दाखवण्यास सांगिला. वडिलांच्या या अशा आदेशावर मायकल जरा गोंधळलाच त्याने विचार केला एक डाॅलरचा हा जुना शर्ट कोण घेणार बरे तरीही प्रयत्न करून पाहू म्हणून त्याने शर्ट नीटनेटका स्वच्छ धुतला आणि कडक
करण्यासाठी इतर कपड्यांमध्ये घालून ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी शर्ट विकण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी खूप दूरवर फिरावे लागले हा शर्ट विकण्यासाठी त्याला तब्बल आठ तास मेहनत घ्यावी लागली. तेव्हा कुठे हा शर्ट विकला गेला.
एक डाॅलरचा शर्ट दोन डाॅलरला विकल्याचा विलक्षण आनंद मायकलच्या तोंडावर साफ झळकत होता आणि तोच आनंद दाखवण्यासाठी तो वडिलांकडे गेला परंतु वडिल त्याच्या कार्यावर थोडेच खूश झाले कारण त्यांच्यासाठी हे खुपच छोटं काम होतं त्यांन अजून पहिलीचं पायरी पार केली होती. त्यानंतर त्याला लगेच काही दिवसांनी दुसरं कार्य नेमुन दिलं,
नक्की वाचा:“संपूर्ण जगाला आपल्या कार्टूनने वेड लावणारे वॉल्ट डिस्नी “
तसाच 1 डाॅलर किमतीचा शर्ट त्यांनी त्याला 20 डाॅलरला विकून दाखवण्यास सांगितले. परंतु अशा या कार्याने मायकलपुढे खुप मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे एखादी वस्तू तब्बल वीस पटीनं विकणं कशी शक्य आहे. परंतु त्यासाठी काहीतरी करावं तर लागेलच म्हणून त्याने आधीच्या शर्टसारखं त्याला स्वच्छ धुवून कडक केलं व त्यावर मित्राच्या मदतीने एक छोटासा मिकी माऊस स्टिकर चिटकवला व अतिश्रीमंत लोकांच्या मुलांच्या शाळेबाहेर शर्ट घेऊन उभा राहिला त्या शाळेतल्या एका लहान मुलीने शर्टासाठी इतका हट्ट धरला की त्या मुलीच्या वडिलांना तो शर्ट 20 डाॅलरला विकत घ्यावा लागला आणि त्या मुलाची शर्ट विकण्याची धडपड पाहून त्या मुलीच्या वडिलांनी खुश होऊन आणखी 5$ बक्षीस म्हणून दिले.
आधीचे २० डॉलर आणि त्यात मिळालेलं बक्षीस घेऊन मायकल पुन्हा एकदा वडिलांना दाखवायला गेला मात्र यावेळी त्याचे वडील आधीपेक्षा खुश दिसत होते त्यांनी मायकलला शुभेच्छा दिल्या.आता १डॉलर किमतीचा शर्ट मागच्या विकलेल्या शर्टच्या किमतीच्या दहा पटींनी अधिक किमतीत विकण्याचं कार्य सोपवलं होतं.
ह्यावेळेस मायकलला हे काम मागच्या कामापेक्षा कितीतरी पटींनी अधिक अशक्य वाटत होतं परंतु हे कामही आपण पूर्ण करु हा विश्र्वास त्याला मागे पार पाडलेल्या कामगिरीच्या अनुभवातून मिळाला होता आणि मायकल जास्त विचार न करता तयारीला लागला . तेव्हा तेथे त्याकाळची हाॅलिवुडची अतिशय सुंदर अभिनेत्री फराह आली होती तिच्यासाठी अनेक चाहत्यांची गर्दी उसळली होती. आणि सुरक्षाही तेवढीचं काटेकोर होती. परंतु काहितरी करायचा विचार घेऊन थांबलेला मायकल सर्व सुरक्षा भेदून त्या अभिनेत्रीपाशी जाऊन पोहोचला आणि अॅटोग्राफ मागू लागला ह्या एवढ्या छोट्याशा निरागस मुलाला अॅटोग्राफ साठी त्या अभिनेत्रीने लगेच होकार दिला आणि तो दुसऱ्या दिवशी शर्ट विकण्यासाठी सज्ज झाला.
हाॅलिवुड ची सर्वात सुंदर अभिनेत्री फराहच्या हस्ताक्षरातील सहीचा शर्ट असं ओरडल्यावर सुरूवातीच्या शर्टास विकण्यासाठी ८ तास लागले होते नंतरच्या शर्टासाठी ४ तास आणि आता फक्त ४ मिनिटांत मोठी गर्दी निर्माण झाली कुणी १०० $ कुणी ५०० $ कुणी १००० $ अशी बोली लावायला लागले अखेर कुणीतरी तो शर्ट २००० डाॅलरला विकत घेतला.
(Michael Jordan/Photo Credit: Google)